ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

महाराष्ट्रात मुसळधार पावसाचे थैमान

मुंबई- आज सकाळपासून मुंबईत पावसाने हजेरी लावलेली आहे. सकाळपासून रिमझिम पाऊस सुरूच आहे. असंच दिवसभर पाऊस चालू राहिलं तर मुंबई ची तुंबई होऊ शकते. अनेक ठिकाणी पाणी भरण्याची शक्यता आहे. बोरिवली पश्चिम महामार्गावर गाड्यांचे आवक जावक सुरू आहे. अनेक ठिकाणी पहिल्याच पावसामध्ये पाणी भरले होतं. आज महानगरपालिका तर्फे अनेक ठिकाणी पंप लावण्यात आलेला आहे जेणेकरून पाणी भरू नये याकरिता पाणी काढण्यासाठी वॉटर पंप लावण्यात आलेला आहे
भिवंडी शहर व ग्रामीण भागात सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे भिवंडी शहरातील तीनबत्ती, भाजी मार्केट, बाजारपेठ परिसरात रस्त्यावर 2 ते 3 फुटांपर्यंत पाणी साचलं आहे. येथील अनेक दुकानात पाणी शिरल्याची घटनादेखील घडली आहे.
मुसळधार पावसाची हजेरी. ठाणे ते मुंबईच्या दिशेने मुंबईहून ठाण्याच्या दिशेनेजाणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या लांब लांब रांगा, रस्त्यांच्या अर्धवट राहिलेल्या कामांमुळे वाहतूक कोंडी. वाहतूक कोंडीचा सामना कामावरती जाणाऱ्या चाकरमान्यांना करावा लागत आहे.
सलग चौथ्या दिवशी पालघर जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी. पालघर , बोईसर, डहाणू, कासा, तलासरी परिसरात मागील दोन तासांपासून मुसळधार पाऊस. पुढील तीन ते चार तास जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी कायम राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज. नागरिकांनी घराबाहेर पडताना सतर्कता बाळगावी असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
सिंधुदुर्ग तळकोकणात रात्रीपासून सर्वत्र दमदार पाऊस कोसळत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळत असून वैभववाडी, कुडाळ, कणकवली, सावंतवाडीत पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्यातील नद्या, ओहोळ प्रवाहित व्हायला सुरुवात झाली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याला सध्या येलो अलर्ट दिला असून पुढील तीन ते चार दिवस जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली
रत्नागिरी – गणपतीपुळे मार्गाला पावसाचा फटका बसला आहे. भंडारपुळेत पावसाचं पाणी रस्त्यावर आलं असून दोन्हीकडची वाहतूक ठप्प झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज आँरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
भंडारा जिल्ह्यात दोन दिवसापासून पावसाची रिपरिप सुरूच आहे. कधी जोरदार तर कधी रिमझिम पाऊस बरसत आहे. तर लाखांदूर तालुक्यातील मांढळ येथील कौलारू घराचे छत कोसळल्याची घटना घडली आहे. गणेश भगवान धकाते रा. मांढळ असे पीडित घरमालकाचे नाव आहे. घराचं छत पावसामुळे कोसळलं. यात जीवित हानी झाली नसली तरी घरातील जीवनापयोगी साहित्याची नासधूस झाली आहे. दरम्यान, पीडित गणेश धकाते यांच्या घराच्या झालेल्या नुकसानीचा त्वरित पंचनामा करून शासकीय मदत द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

error: Content is protected !!