पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघात विकास कामाचा धडाका
गाडगेबाबा चौक येथे नूतनीकरण व सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन
मुंबई (किसन जाधव) राज्याचे पर्यावरण मंत्री व शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी राज्यात आपल्या खात्याची जबाबदारी योग्यरीत्या पार पदित असताना आपल्या मतदार संघातील विकास कमानही चालना दिली असून त्यांच्या वरळी मतदार संघात अनेक विकास कामे सुरू झालेली आहेत माझा प्रभाग सुंदर प्रभाग या संकल्पाने अंतर्गत सत्रस्टा येथील संत गाडगे बाबा उद्यानाचे नूतनीकरण आणि सुशोभीकरण करण्यात येणार असून आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. महापौर किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत, सेना उपनेते सचिन अहिर, माजी आमदार सुनील शिंदे, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, ई प्रभाग समितीचे अध्यक्ष रमाकांत रहाटे, परिमंडळ दोनचे उपायुक्त बालमवार ,जी दक्षिण चे सहाय्यक आयुक्त शरद उघडे आदी मान्यवर उपस्थित होते.