अच्छे दिन विरुद्ध सच्चे दीन
२०२४ ची निवडणूक मोदी विरूद्ध संपूर्ण देश अशी असेल-ममता बॅनर्जी
दिल्ली-मोदी सरकारच्या विरुद्ध आता देशातील सगळे विरोधक एकवटले असून ५ दिवसांच्या दिल्ली भेटीवर आलेल्या ममता बॅनर्जी यांनी काल सोनिया गांधी सह सर्व प्रमुख विरोधी नेत्यांची भेट घेतली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की २०२४ ची लोकसभा निवडणूक ही मोदी विरूद्ध संपूर्ण देश अशी असेल तसेच यापुढे अचछे दीन नव्हेत तर सच्चे दोन येतील असेही त्या म्हणाल्या
मोदींच्या विरोधात सर्व पक्षीय मोट बांधण्याचे काम शरद पवार यांनी यापूर्वीच सुरू केले होते त्यानंतर काल ममता बॅनर्जी यांनी सोनिया गांधी शरद पवार अरविंद केजरीवाल आदी प्रमुख विरोधी नेत्यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली तत्पूर्वी त्या केवळ औपचारिकता म्हणून पंतप्रधान मोदींनाही भेटल्या दरम्यान संसदेत विरोधी पक्षाच्या खासधाराणा बोलू दिले जात नाही असा आरोप करून राहुल गांधी यानी मोदी सरकारवर जोरदार टीका केली .संसदेत झालेल्या गोंधळला मोदीच जबाबदार आहेत कारण संसदेत खासदारांना लोकांचे प्रश्न मांडण्याचा पूर्ण अधिकार असताना सरकार विरोधकांची मुस्कटदाबी करीत असल्याने आता सरकारच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यायला हवे असे त्यांनी सांगितले तर पवार आणि ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षात एकत्र आणण्याचे जे प्रयत्न चालवले आहेत त्यांना नक्कीच यश येईल असा विश्वास विरोधी पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केलाय॰
/ लोकसभेत गदारोळ १० खासदार निलंबित.
फोन टॅपिंग प्रकरणी मोदी व अमित शहा यांनी निवेदन करावे या मागणीसाठी संसदच्या पावसाळी अधिवेशनात गोंधळ घालणाऱ्या लोकसभेतील १० खासदारांना सभापती ओम बिर्ला यांनी अधिवेशनाच्या संपूर्ण कालावधीसाठी निलंबित केले आहे .यात मनिकं टागोर,सिन कुरिकोसे,हेबि एडण,एस.ज्योती मनी,रुनित बिट्टू,गुरुजित ओजला, टी.एन. प्रथपण, व्हीं.वाटीलिनिगण,सप्तगिरी शंकर,आणि दीपक बाज यांचा समावेश आहे