विरार मध्ये महिलेची हत्या करून दागिने लुटले
विरार मध्ये महिलेची हत्या करून दागिने लुटले
दि. २8 : सुमन लाला वर्मा (वय २६) रा. गल्ली नं. ४, गांधीनगर, भोलानगर, भाईंदर (प) ह्या घरात एकट्या असताना दि. २१ जुलै २०२१ दुपारनंतर अज्ञात व्यक्तीने चोरी करण्याच्या उद्देशाने त्यांचा गळा आवळून जीवे ठार मारून त्यांच्या अंगावरील रु. ३५,८०० किंमतीचे सोन्याचे दागिने व बॅगेत असलेले आधारकार्ड, एटीएम कार्ड व इस्त्री साउंड बॉक्स असे सामान चोरी करून लुटून नेले होते. याबाबत मयत सुमनचे पती लाला सुग्रीव वर्मा यांच्या तक्रारीवरून अज्ञातांविरोधात भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यात प्रथमदर्शनी कोणत्याही प्रकारचा पुरावा नसतांना काशीमीर गुन्हे शाखा कक्ष-१ यांनी गुन्ह्यातील घटनास्थळावरून मिळालेल्या प्राथमिक माहितीवरून तसेच साक्षीदारांच्या जाब जबाबावरून गुन्ह्याची अचूक माहिती मिळवून गुन्हे शाखा कक्ष-१ च्या पोलीस पथकाने वरिष्ठांच्या परवानगीने थेट बलिया, उत्तर प्रदेश गाठले. तेथे एसटीएस पथकाची मदत घेऊन खुनाच्या गुन्ह्यातील संशयीत सोनू विजय चौहान (वय ३०) रा. गालाफपुर, सुधीर तुलसी चौहान (वय १९) रा. कुसबरी आणि मुन्नी कुलदीप चौहान (वय ३२) रा. रक्षा डीनिया, जि बलिया तिघांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता चोरी करण्याचे उद्देशाने गुन्हा केल्याची कबुली दिली. विशेष म्हणजे या गुन्ह्यामध्ये कुणीही प्रत्यक्षदशी साक्षीदार वा पुरावा नसताना गुन्हे शाखेने गुन्हा उघडकीस आणला.
पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. महेश पाटील, अति. कार्यभार (गुन्हे) चे पो. उपायुक्त विजयकांत सागर, सहा. पो. आयुक्त (गुन्हे) रामचंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पो. निरीक्षक जितेंद्र वनकोटी, पो. निरीक्षक अविराज कुराडे, सपोनि. विलास कुटे, सपोनि. निलेश शेवाळे, पोउनिरि. हितेंद्र विचारे, सहा. पोउनि. वेदपाठक, सहा. पोउनि. राजू तांबे, पोहवा. संदीप शिंदे, पोहवा. किशोर वाडिले, पोहवा. अर्जुन जाधव, पोहवा. संजय शिंदे, पोहवा. अविनाश गर्जे, पोना. पुष्पेंद्र थापा, पोना. सचिन सावंत, पोशि. विकास राजपूत, सर्व नेम. गुन्हे प्रकटीकरण शाखा-१ तसेच मध्यवर्ती प्रकटीकरण कक्षाचे पोशि. सतीश जगताप व पोशि. महेश वेल्हे यांच्या संयुक्त पथकाने कौशल्यपूर्ण कामगिरी केली. गुह्यचा पुढील तपास सुरू आहे.