मुंबई महापालिकेची एम इ इंफ्राप्रोजेक्ट प्रा. ली. आणि एन. ए. कन्स्ट्रक्शन प्रा. ली. कंत्राटदारांवर मेहरनजर –
मुंबई – महापालिकेत कंत्राट देताना अनेकांचे हात काळे झाल्याचं समोर आले आहे. मुंबई महापालिकेत ‘हात टाकाल तिथे घोटाळा’अशी परिस्थिती बघायला मिळत आहे. नियमांची पायमल्ली करत आणि अनेक कंत्राटदारांना कामं दिल्याचं समोर आले आहे. पावसाळ्यात रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. त्याची कारणंदेखील कॅगच्या अहवालात समोर आली आहे.
मुंबई महापालिकेचा कॅगचा अहवाल सादर झाल्यानंतर पालिकेच्या प्रशासनावर ताशेरे ओढण्यात आले होते. पालिकेचा कारभार अपारदर्शक, निधीचा निष्काळजीपणाने वापर आणि ढिसाळ नियोजन झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. सोबतच, यासंदर्भात एसआयटी देखील लावण्यात आली आहे. मात्र, यासर्वात रस्त्यांची कंत्राटं देताना नियमांची पायमल्ली झाल्याचं समोर आलंय. सध्या पावसाळ्यात अनेक रस्त्यांवर खड्डे पाहायला मिळत आहेत. अशात पालिकेत होत असलेल्या भ्रष्टाचामुळेच हे रस्ते सुस्थितीत नसल्याचं आढळतंय. पालिकेच्या रस्ते आणि वाहतूक विभागाच्या ५६ कामांचा कॅगकडून अभ्यास करण्यात आला. यामध्ये ५२ पैकी ५१ कामे कुठल्याही प्रकारचे सर्वेक्षण न करताच निवडली गेल्याची गंभीर बाब समोर आलीय. पूलासोबतच रस्त्यांच्या दुरुस्ती संदंर्भात ही निविदा न मागवता कामं दिली गेलीत हे कॅगच्या चौकशी मध्ये दिसून येत आहे. महापालिकेच्या दोन कंत्राटदारांवर मेहेरबान असल्याच चौकशी दिसून आलं आहे. एम इ इंफ्राप्रोजेक्ट प्रा. ली. आणि एन. ए. कन्स्ट्रक्शन प्रा. ली. या कंत्राटदारांवर महापालिकेने मेहरनजर दाखवली. या दोन्ही कंपनींना 2021-22 मध्ये निविदा न मागवता 19 रस्ते बनवण्याचं काम दिलं. ज्याची एकूण किंमत ५४ कोटी रुपये इतकी होती. अशाच प्रकारे मुंबईतील अनेक भागत निविदा, कंत्राट न करता कामं दिल्याचं संशय कॅग आणि एसआयटीला आहे. ज्याचा तपास पुढे केला जाणार आहे. जर असे असेल तर मुंबईकरांना होणार खड्यांचा त्रास का होता यांच उत्तर ही मिळू शकणार आहेत.