ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

नंदुरबार मधील शाळेत पाचवीतल्या विद्यार्थिनीचा विनयभंग

नंदुरबार – बदलापूर मधील शाळेतल्या चिमुकल्या विध्यर्थीनींच्या विनयभंगाची घटना ताजी असतानाच नंदुरबार मध्ये एका शाळेत पाचवीतल्या विद्यार्थिनीचा विनयभंग केला या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहनंदुरबार शहरातील एका नामांकित शाळेत सफाई कामगाराने पाचवीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीला आपल्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ दाखवून विनयभंग केल्याचा खळबळजनक प्रकार उघड झाला आहे. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून या घटनेविषयी सदर विद्यार्थिनीने आपल्या पालकांना सांगितले. यानंतर पालकांनी नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला तक्रार नोंद केली. त्या तक्रारीवरून शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कर्मचाऱ्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून शाळेकडून या कर्मचाऱ्यावर कारवाई करून त्याला बडतर्फ करण्यात आले आहे. या घटनेप्रकरणी नंदुरबार शहरातील पालकांमध्ये आपल्या विद्यार्थिनी विषयी असुरक्षिततेची भावना समोर येत आहे. पोलिसांनी या संदर्भात योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलीस तपास करत आहेत, अशी माहिती नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रावण दत्त एस यांनी दिली आहे. दरम्यान या खळबळजनक प्रकारानंतर शाळेतील मुलींच्या सुरक्षिततेविषयीचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.

error: Content is protected !!