ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

मालवणमध्ये ठाकरेगट – राणे समर्थकांमध्ये राडा – घरात घुसून मारण्याची राणेंची मविआच्या नेत्यांना धमकी


मालवण -छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणमधील पुतळा पडल्यानंतर महाराष्ट्रात राजकारण सुरु झाले आहे. आज मविआने मालवण मध्ये मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला यावेळी ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि राणे समर्थक एकमेकांना भिडले. पोलिसांनी मध्यस्थी करून हा राडा थांबवला यावेळी नारायण राणेंनी मविआच्या नेत्यांना घरात घुसून मारण्याची धमकी दिली
सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने घटनेची पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते राजकोट किल्ल्यावर गेले होते. यादरम्यान भाजपाचे खासदार नारायण राणे आणि निलेश राणे हे देखील आपल्या समर्थकांसह किल्ल्यावर पोहोचले. यावेळी राणे-ठाकरे समर्थकांमध्ये राडा झाला. यावर सिंधुदुर्गपोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी प्रतिक्रिया दिली.
परिसरात जो राडा झाला त्याबद्दल पोलिस निश्चित कारवाई करणार असून व्हिडिओ फूटेज तसेच फोटो बघून नंतर कारवाई करण्यात येणार आहे. वेळेत थोडसे पुढे-मागे झाल्यानेच दोन्ही पक्षाचे नेते एकाच वेळी किल्ला परिसरात आले त्यामुळेच हा प्रसंग घडला. पण पोलिसांनी परिस्थिती योग्य पध्दतीने हाताळली असल्याचे सिंधुदुर्ग पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. लाठीचार्ज केला असता पण आम्ही दोघांना समजावणे महत्वाचे मानले असे ही ते म्हणाले.
किल्ला परिसरात झालेल्या जोरदार राड्यामुळे याठिकाणचे वातावरण काही तणावपुर्ण बनले होते. मोठी घटना घडण्यापुर्वीच पोलिसांनी योग्य पध्दतीने ही परिस्थिती हाताळली. यामुळे वेळीच परिस्थिती नियंत्रणात आली. पोलिस अधीक्षक म्हणाले, दोन्ही गटाचे समर्थक समोरासमोर आले तर काही तरी घडेल म्हणून आम्ही वाढीव पोलिस बंदोबस्त ठेवला होता. पण दोघांनाही दिलेल्या वेळात थोडा पुढे मागे झाले आणि उध्दवसेनेचे पदाधिकारी व भाजपचे पदाधिकारी एकाच वेळी किल्ला परिसरात आले आणि त्यानंतर थोडासा राडा झाला. मात्र, पोलिसांनी योग्य पध्दतीने परिस्थिती हाताळली त्यामुळे आम्ही लाठीचार्ज केला नाही. अद्याप याबाबत तक्रारी दाखल झाल्या नाहीत. मात्र, आम्ही व्हिडिओ तसेच फोटो बघून गुन्हे दाखल करणार असल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले.

error: Content is protected !!