ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्याराजकीय

जावेद अख्तर यांना RSS ची तुलना तालिबानशी करणे महागात पडेल-भवानजी

मुंबई-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुठल्याही अपेक्षेशिवाय घरच खाऊन खिशातले पैसे खर्च करून आणि स्वतचा वेळ देऊन समाजाची निस्वार्थ भावनेने सेवा करीत असतो म्हणूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही देशातील सर्वात मोठी आणि चांगली युनिव्हार्सिटी आहे .म्हणूनच संघाला राजकीय वादात ओढू नका अशा शब्दात बाबूभाई भवानजी यांनी जावेद अखतर यांना बजावले आहे . राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डों.केशव बळीराम हेग्डेवार यांचे आणि संघाचे निस्वार्थ हिंदू हिताचे कार्य पाहून नागपुरचे राजे भोसले यांनी हेडगेवर यांना एक मोठा भूखंड दान देऊ केला होता . पण त्यांनी तो विंनम्रपणे नाकारून सांगितले की मला या कार्यासाठी काहीही विनामुल्य नको ही भूमी मी योगी तो मोबदला देऊन विकत घेईन जेणे करून भविष्यात कुणी म्हणता नये की संघाने फुकट काही घेतले. त्यानंतर हेड्गेवार यांनी स्वयमसेवकांकडून जमा असलेल्या पैशातून रेशीमबाग येथील भूखंड नोंदणी करून अधिकृतरीत्या विकत घेतला आणि त्यातील सर्व वस्तु स्वयमसेवकणी दरवर्षी अर्पण केलेल्या निधीतून बांधल्या अर्थात संपूर्ण भारतभर दुसर्‍यांच्या जमिनी हडप करणार्‍यांना हे कसे ठाऊक असेल भारतरत्न पंडित मदन मोहन मालविय यांनी डॉक्टरांना संगितले की तुम्हाला सर्व कार्यासाठी लागणारा निधि मी दान मागून आणून देतो . पण डों. हेडगेवर यांनी त्याला नकार दिला व संगितले की माझे स्वयंसेवक त्यांच्या वैयक्तिक उत्पन्नातून त्यांना मिळणार्‍या धंनाच्या समर्पणातून आवश्यक तो निधि जमवतील हा संदेश त्यांनी दिला . आज तीच परंपरा संघ चालवतोय पण दुसर्‍याचा पैसा अनेक मार्गानी लुटणार्‍याना हे कळणार नाही असे बाबूभाई पुढे म्हणाले की संघाचे तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी तर सरसंघ चालकच्या अत्यविधी अथवा समाधीसाठी वेगळी भूमी नको तर इतर सर्वसामान्य लोका प्रमानेच स्मशाभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करावेत आणि त्याची सुरुवात स्वता पासून केली पुढे तोच पायंडा रज्जु भय्या आणि सुदर्शन यांनी चालू ठेवला पण हे तुमच्या पचणी पडणार नाही कारण मेल्यावर समाधी आणि अंत्यविधीच्या नावाखाली शेकडो ऐकर जमीन लाटण्याची तुमची परंपरा आहे अशा शब्दात बाबूभाईनी सुनावले पुढे म्हणाले की संघाचे जावू द्या त्यांच्या इतका त्याग करायची तुमची कुवत नाही त्यामुळे निदान भाजपशी तरी बरोबरी करू नका .वाजपेयी 6 वर्ष पंतप्रधान होते मात्र त्यांचे निधन होताच त्यांच्या दत्तक मुलीने तत्काल सरकारी बंगला खाली केला . सुषमा स्वराज अरुण जेटली यांनी मंत्रिपद तसेच खासदारकी गेल्यावर सरकारी बंगले ताबडतोब खाली केले . अनंत कुमार मंत्री असताना स्वर्गवासी झाले पण त्यांच्या पत्नीने ताबडतोब बंगला खाली केला . फडणवीस 5 वर्ष मुख्यमंत्री राहूनही मुंबईत घर घेऊ शकले नाहीत , अनेक नेते तीन तीन पिढ्या सरकारी बंगल्यावर कब्जा करून बसलेत तुमच्या मित्रपक्षाच्या एका नेत्याने तर बंगला खाली करताना नळ तोटया वातानुकूलित पत्रे सुधा काढून नेले म्हणूनच अख्तर साहेब निस्वार्थी होणे सेवा करणार्‍या संघाला राजकरणात ओढू नका असे भवानजी यांनी म्हटले आहे

error: Content is protected !!