ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्रमुंबई

गुरेढोरे माणसे आणि एस टी सुधा वाहून गेली महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार

:मुंबई/ महाराष्ट्रात परतीच्या पावसाने हैदोस घातला असून मराठवाडा,उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाने हैदोस घातलाय अनेक नद्यांना पुर आल्याने गुरेढोरे तर काही ठिकाणी माणसेही वाहून गेली उमरखेड तालुक्यातील दहागव नाक्यावर पुराच्या पाण्यात एस टी बस वाहून गेली त्यात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला .मुंबईत सुधा सकाळ पासून पावसाची संततधार सुरू होती
सोमवारी रात्री पासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती यात विदर्भातील यवतमाळ वाशिम वर्धा नागपूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक होता .त्यामुळे नद्या नाल्याना पूर येवून पुराचे पणी काही गावात शिरले या पाण्याचा वेग इतका होता गुरेढोरे सुधा वाहून गेली नाशिक जिल्ह्यात तुफान पाऊस पडत असल्याने गंगापूर धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात आला त्यामुळे गोदावरीच्या पाणलोट क्षेत्रातील काही गावे पाण्याखाली गेली .नदीकाठची मंदिरेही पाण्याखाली गेली त्यामुळे नाशिक जिल्ह्यात प्रशासन युध्पटलीवर बचाव कार्य करीत आहेत उत्तर महाराष्ट्रातील नाशिक सह जळगाव, नंदुरबार धुळे या जिल्ह्यांमध्ये पावसानं हाहाकार मजला आहे .मराठवाड्यातील बीड,परभणी,हिंगोली जालना आणि लातूर मध्ये तुफान पाऊस पडतोय त्यामुळे शेतीच प्रंचड नुकसान झाले शेतात पाणी शिरल्याने पिके नष्ट झाली आहेत नागपूर वरून नांदेड कडे जाणारी ए स्टी पुलावरून पुराच्या पाण्यात पडली त्यातील दोन प्रवासी वाहून गेले तर इतरांना गावकऱ्यांनी वाचवले या पावसाने ग्रामीण भागातील जनतेचे प्रंचड नुकसान झाले आहे

बॉक्स/ मदतीबाबत सरकार उदासीन
सध्या दुसऱ्यांदा महाराष्ट्रात अतिवृष्टी होऊन प्रंचड हानी झाली मात्र मदतीबाबत सरकारकडून कोणतेही पाऊल उचलले जात नसल्याने शेतकरी नाराज झाले आहेत तर पंचनामे झाल्याशिवाय मदतीची घोषणा होणार नाही असे सांगितले जातेय त्यामुळे ज्या भागात अतिवृष्टीने नुकसान झाले तिथले शेतकरी हवालदिल झालेत

error: Content is protected !!