ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

सिनेटच्या निवडणुकीत भाजपचा अभापीव चा सुपडा साफ – आदित्य ठाकरेंच्या युवसेनेचा मोठा विजय

मुंबई विद्यापीठाच्या बहुप्रतिक्षित सिनेट निवडणुकींचा निकाल आज अखेर समोर येत आहे. ही निवडणूक गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होती. निवडणूक वारंवार पुढे ढकलण्यात येत असल्यामुळे विरोधक आक्रमक झाले होते. अखेर या निवडणुकीसाठी २४ सप्टेंबर २०२४ ला मतदान पार पडलं होतं. विद्यापीठाच्या 10 नोंदणीकृत पदवीधारकांच्या जागांसाठी ही निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत एकूण 28 उमेदवारांनी अर्ज केला होता. तरीही ठाकरे गटाची युवासेना विरुद्ध भाजप पुरस्कृत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यात या निवडणुकीत थेट लढत झाली. या निवडणुकीचे निकाल आज समोर येत आहे. सध्या मतमोजणी सुरु आहे. आतापर्यंत पाच जागांचे निकाल समोर आले आहेत. या पाचही जागांवर युवासेनेच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. विशेष म्हणजे या सिनेट निवडणुकीत पालघरचे भाजप खासदार हेमंत सावरा यांच्या बहीण निशा सावरा यांनीदेखील उमेदवारी लढवली होती. त्यांचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे. निशा सावरा यांचे वडील हे विष्णू सावरा हे माजी आदिवासी मंत्री आहेत.
महापालिकेच्या सिनेट निवडणुकीतील ५ आरक्षित जागांचा निकाल आतापर्यंत समोर आला आहे. या पाचही जागांवर युवासेनेच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. महिला प्रवर्ग म्हणून आरक्षित असलेल्या जागेवर युवासेनेच्या उमेदवार स्नेहा गवळी विरुद्ध अभाविपच्या रेणूका ठाकूर या निवडणुकीच्या मैदानात होत्या. या निवडणुकीत स्नेहा गवळी यांचा तब्बल ५९१४ एवढ्या दणदणीत मतांनी विजय झाला आहे. तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या रेणूका ठाकूर यांना केवळ 893 जागांवर समाधान मानावं लागलं आहे.
सिनेट निवडणुकीत एस्सी प्रवर्गातून युवासेनेकडून शीतल शेठ देवरुखकर यांनी अर्ज केला होता. तर अभाविपकडून राजेंद्र सायगावकर यांनी अर्ज दाखल केला होता. दोन्ही उमेदवारांमध्ये लढत झाली पण या जागेवरही युवासेनेने सहज विजय मिळवला. युवासेनेच्या शीतल शेठ देवरुखकर यांना तब्बल 5489 मतांनी विजय झाला. तर अभाविपचे राजेंद्र सायगावकर यांना केवळ १०१४ मतांवर समाधान मानावं लागलं.

error: Content is protected !!