एस टी कामगारांचा संप मागे
मुंबई/ राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या सेवेत विलीन करून घ्या तसेच त्यांचे थकीत वेतन आणि महागाई भत्ता बाबत तातडीने निर्णय घ्या या मागण्यांसाठी एन दिवाळीच्या तोंडावर राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी जो संप पुकारला होता तो आज सरकार बरोबर झालेल्या चर्चे नंतर मागे घेण्यात आला त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेने सुटकेचा निःश्वास टाकला आहे .
एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा सरकार सहानुभूतीपूर्वक विचार करणार असून तूर्तास २८ टक्के महागाई भत्ता दिला जाणार आहे . पूर्वी महागाई भत्ता १७ टक्के होता त्यात आता ११ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे आज परिवहन मंत्री अनिल परब यांनी ही घोषणा केली त्यामुळे संप मागे घेण्यात आला .