ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामहाराष्ट्रमुंबईविश्लेषण

मुंबई जनसत्ता पोर्टल ची यशस्वी वर्षपूर्ती !

सध्याचं जमाना हा डिजीटलचा जमाना आहे. लोक कधी नव्हे इतके आज सोशल मीडियावर अक्टीव्ह झालेले आहेत. त्यामुळे जगाच्या कुठल्याही कानाकोपर्‍यात कोणत्याही बर्‍या वाईट घटना घडोत त्याच्या काही क्षणातच सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटतात आणि म्हणूनच सोशल मीडिया मध्ये युट्यूब चॅनल आणि वेब पोर्टल याना एक अनन्य साधारण असे महत्व प्राप्त झालेले आहे. दुर्दैवाने शासन प्रशासन यांच्यातला भ्रष्टाचार उघडकीस आणण्याची जबाबदारी ज्या मोठ्या वृत्तपत्रांवर किंवा न्यूज चॅनलवर आहे ते सरकारचे मिंधे झालेले आहेत. कारण त्यांना सरकारी जाहिराती हव्या असतात त्यामुळे ते सरकारला दुखवत नाही. त्याच बरोबर गोर गरीब जनतेकडून त्यांना काही मिळत नाही म्हणून त्यांच्याही समस्यांवर ते चर्चा करायला तयार नाहीत. गरीब मध्यमवर्गीय जनतेची हीच अडचण लक्षात घेऊन गेल्या वर्षी आम्ही मुंबई जनसत्ता साप्ताहिका सोबत मुंबई जनसत्ता वेब पोर्टल सुरू करण्याचा निर्णय घेतला .मात्र यात असलेली स्पर्धा आणि मोठा खर्च पाहता आमचा हा निर्णय खूप धाडसी होता. पण जीवनात असे धाडसी निर्णय घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही आणि स्पर्धेत टिकून राहतं येत नाही. म्हणूनच आम्ही यात उतरलो आमच्यासाठी वेब पोर्टल हा प्रकार तांत्रिक दृष्ट्या नवीन होता. पण मित्र पत्रकार बापू जाधव,दिनेश मराठे, शिरीष वानखेडे आणि हितचिंतकच्या मदतीने यातील बारकावे आम्ही समजून घेतले आणि गेली वर्षभर मुंबई जनसत्ता पोर्टेलची यशस्वी वाटचाल सुरू आहे. या वर्षभरात आम्ही खूप काही केले आमच्या पोर्टलच्या वाचकांना रोज घडणार्‍या घटनांच्या अपडेट तर देतच आहोत पण पालिका आणि सरकार मधील भ्रष्टाचार सुधा उघडकीस आणला आहे. खास करून पालिकेवर आम्ही अधिक लक्ष दिले कारण 40 हजार कोटींचा बजेट असलेली मुंबई महापालिका ही आशिया खंडातील सर्वात मोठी महापालिका म्हणून ओळखली जाते. पण जनतेने कराच्या रूपाने. पालिकेला दिलेले हे 40 हजार कोटी नेमके जातात कुठे त्यातून मुंबईच्या नागरी सुविधांची कामे प्रामाणिकपणे केली जातात का? कंत्राटदार पालिका अधिकारी आणि पालिकेतील सत्ताधारी नगरसेवक या अभद्र त्रिकुटाच्या युतीने मुंबईकरांची कशी लूट चालवली आहे. हे पालिकेच्या वेग वेगळ्या विभागातील आणि खात्यातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणून आम्ही दाखवून दिले आहे. तसेच सध्या महाराष्ट्रात जे किळसवाणे राजकारण सुरू आहे त्यावरही बेधडक ताशेरे ओढले अगदी आरक्षण ,एस टी कामगारांचा संप, लव्ह जिहाद सारखा धार्मिक उन्माद आदी सर्व विषय आम्ही वर्षभरात हाताळले आणि ते आमच्या वाचकांच्या सुधा पसंतीस पडले. आमच्या या वाटचालीत आम्ही कधीही कुठल्या जाती धर्माच्या किंवा पक्षाच्या बाजूने लिहले नाही ज्यांनी चांगली आणि लोक हिताची कामे केली त्यांच्या विषयी चांगले लिहले आणि ज्यांनी जनतेला लुबडण्याचे काम केले त्यांच्यावर शब्दांचे आसूड ओढले आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे गोर गरीब मध्यम वर्गीय यांच्या रोजगाराचा प्रश्‍न असो, आरोग्याची समस्या असो की त्यांच्यावर कुणी अन्याय केलेला असो आम्ही बेधडक त्याची बाजू मांडून त्यांना न्याय मिळवून दिला. मोठे पेपरवाले आणि चॅनल वाले गरिबांच्या बातम्या छापत नाहीत दाखवत नाहीत पण आम्ही मात्र गरीब मुलांच्या शालेय वस्तूंच्या वाटपाची बातमी असो किंवा गल्ली बोळात झालेल्या नागरी सुविधांच्या कामाच्या बातम्या असो त्यांना प्राधान्य दिले म्हणूनच या सर्वांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहिले आणि यापुढेही राहतील आणि याच आशीर्वादाचा जोरावर आमची वर्षभर वाटचाल सुरू आहे. आमच्या वाचकांनी हितचिंतकांनी आणि जाहीरातदाराची यापुढेही अशीच कृपादृष्टी ठेवावी हीच प्रार्थना
-संपादक किसनराव जाधव

error: Content is protected !!