ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

22 हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला गेल्याने – राज्यातील वातावरण तापले

मुंबई/ महाराष्ट्राच्या नागपूर मधील मिहान मध्ये टाटा एर बस आणि स्पेन मधील एक कंपनीच्या संयुक्त विद्यमाने होणारा 22 हजार कोटींचा विमान प्रकल्प गुजरातला गेल्याने महाराष्ट्रातले राजकारण चांगलेच तापले आहे . आता सरकार आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत आहेत गेल्या वर्षी सप्टेंबर 2021 मध्ये स्पेन मधील एक कंपनी आणि देशातील टाटा उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने मालवाहतूक विमान निर्मितीचा एक प्रकल्प उभा राहणार होता आणि तो नागपूर मधील मिहान मध्ये होणार होता .पण नंतर हा प्रकल्प गुजरात मधील बडोदा येथे होणार आहे आणि 30ऑक्टोबरला त्याचे मोदींच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे त्यामुळे विरोधकांनी सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाचे सरकारवर आरोप करायला सुरुवात केली आहे 1 लाख 66 हजार कोटींचा वेदांता फोस्कोन प्रकल्प सुधा गुजरातला पळविण्यात आला होता आणि आता हा प्रकल्प पळविण्यात आला .त्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे भाजपने मात्र महाविकास आघाडीकडे बोट दाखवत आहेत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते मात्र हा प्रकल्प गुजरातला जण्या ऐवजी महाराष्ट्रात यावा यासाठी सरकारने प्रयत्न केले नाहीत म्हणून हा प्रकल्प गुजरातला गेला

error: Content is protected !!