वांद्रे स्थानकावरील चेंगराचेंगरी दहा जखमी
मुंबई/आज वांद्रे रेल्वे टर्मिनस च्या प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची चेंगराचेंगरी होऊन दहा जण जखमी झाले या घटनेनंतर रेल्वे प्रशासन अडबडून जागे झाले असून पुढील 13 दिवसांपर्यंत सीएसटी दादर ठाणे कल्याण पुणे नागपूर या सर्व रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट न देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे
उत्तर भारतात छटपूजन निमित्त मोठ्या संख्येने लोक जातात परंतु दोन दोन महिने रिझर्वेशन असल्याने लोकांना जाता येत नाही ही अडचण लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने विना आरक्षित ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार वांजरी टर्मिनस येथून 22 921 डाऊन वांद्रे गोरखपुर एक्सप्रेस सोडली जाणार होती याची माहिती मिळताच हजारोच्या संख्येने लोक बांद्रा टर्मिनस च्या प्लॅटफॉर्म नंबर एक वर जमले आणि जशी गाडी प्लॅटफॉर्मला लागली तशी गाडीमध्ये चढण्यासाठी चेंगराचेंगरी करू लागले या चेंगराचेंगरी हा प्रवासी जखमी झाली असून त्यातल्या तिघांची प्रकृती चिंताजनक आहे या सर्व जखमी प्रवाशांना बांद्राच्या भाभा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे रेल्वे प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे त्याचबरोबर यापुढे गर्दीच्या रेल्वे स्थानकांवर रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट न देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे हा निर्णय पुढील 13 दिवसांपर्यंत असणार आहे याचे मुख्य कारण मुंबईवरून आपापल्या गावी जाणाऱ्या प्रवाशांना पोचवण्यासाठी त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने प्लॅटफॉर्म पर्यंत येतात त्यामुळे गर्दी जास्त होते आणि हीच गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पुढील 13 दिवस महाराष्ट्रातल्या सगळ्या मोठ्या रेल्वेस्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट बंद केली आहे