ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिका

रस्ते कंत्राटदार पालिकेत कोणाच्या आशीर्वादाने सुटले

मुंबई/ पालिकेतील रस्त्याच्या कामात झालेले घोटाळे नवे नाहीत मात्र या घोटाळ्यात दोषी आढळलेल्या कंत्राटदारांना काळया यादीत टाकलेले असताना पालिकेतील सत्ताधारी त्यांना वाचवत असल्याचे दिसत आहे आणि याचा पुरावा म्हणून कंत्राटदारांना सात वर्षांचा कालावधी कमी करून तीन वर्षांचा करण्यात आला इतकेच नव्हे तर त्यांनाच पुन्हा रस्त्याची कंत्राटे दिली जात आहे .यामागे पालिकेतील त्यांचे गॉडफादर कोण याची पालिका आयुक्तांनी चौकशी करावी अशी मागणी केली जात आहे.या रस्ते घोटाळ्यातील दोषी पालिका अधिकाऱ्यांवर निलंबनाची आणि अटकेची की कारवाई झाली. पालिकेकडून त्यांना अद्याप सुटका झाली परंतु कंत्राटदारांना सूट देऊन भलं करण्यात आल. भ्रष्ट अधिकारी आणि कंत्राटदार तसेच सत्ताधारी नगरसेवक यांचे एक मोठे रॅकेट असून नाले सफाई असो की रस्त्याची कामे असोत यात पालिकेला चुना लावण्याचे काम केले जात आहे असा आरोप मुंबईकर करीत आहेत.दरम्यान मुंबईतील नागरी सुविधांची कामे मुंबईकरांच्या कराच्या पैशातून केली जातात .

error: Content is protected !!