संभल मधील तणावपूर्ण शांतता शाळा कॉलेज सुरू, दुकाने ही उघडली- २६५० लोकांविरुद्ध गुन्हा दाखल ६० जणांना अटक
संभल/उत्तर प्रदेशातील संभलमध्ये 60 जणांना अटक करण्यात आलेली आहे मशिदीच्या सर्वेक्षणाच्या वेळेत झालेली दगडफेक आणि त्यानंतर झालेले हत्याकांड याप्रकरणी आतापर्यंत २६५० लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच आता परिस्थिती हळूहळू निवडत असल्यामुळे संबळ मधील शाळा कॉलेज तसेच दुकानेही उघडण्यात आली आहे त्याचबरोबर संबळ मधील मशिदीच्या मौलानांनी मुस्लिम समाजाला आवाहन केले आहे की त्यांनी मुख्य मशीद जवळ न येता, आपल्या घराजवळच्या मशिदीमध्येच नमाज पडावेत त्याचबरोबर आपला कामधंद्यावर जावे आणि मुख्य म्हणजे जी बंद करण्यात आलेली दुकाने ती पुन्हा सुरू करावी मौलानांच्या या आवाहनानंतर हळूहळू परिस्थिती आटोक्यात येत असून त्यांनी दगडफेक केली .त्यांची पोस्टर्स संपूर्ण संबळ मध्ये लावण्यात आलेली आहे त्यामुळे सीसीटीव्ही आणि इतर पुरावे यांच्या आधारे त्या सर्वांना लवकरच अटक केली जाईल असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले तसेच संबळ मधील जामा मशीद च्या सर्वेक्षणाबाबत नव्याने चर्चा करून पूर्ण बंदोबस्तात सर्वेक्षण केले जाईल असेही सांगण्यात आले आहे