बेरोजगार व सेवा संस्थांना डावलन्याच्या पालिकेचा कृती विरुद्ध फेडरेशन संतप्त-अतिरिक्त आयुक्त डॉक्टर संजीव कुमार माहिती घेणार
मुंबई/ पालिकेच्या 24 वॉर्डातील कामाचा चांगला अनुभव असतानाही कामगार पुरवण्याचे कंत्राट बेरोजगार व सेवा संस्थांना न देता ,खाजगी कंपन्यांना देण्याच्या हालचाली पालिकेकडून सुरू आहेत त्यामुळे बेरोजगार व सेवा संस्था सहकारी फेडरेशनने तीव्र संताप व्यक्त केला आहे.सध्या नायर रुग्णालयात 470 पुरुष आणि124 महिला असे 594 कामगार पुरवले जाणार आहेत आणि त्याचा कालावधी 1 वर्षांचा आहे .मात्र ही कामे बेरोजगार आणि सेवा संस्थाना देण्यात यावीत अशी मागणी बृहन्मुंबई बेरोजगार सेवा सहकारी संस्थांच्या फेड्रेशने नायर रुग्णालय प्रशासनाकडे मागणी केली आहे या बाबतचे एक पत्र नायरच्या अधिष्ठाता याना देण्यात आले आहे .सदर कामे खाजगी कंपन्यांना देण्यात येणार असल्याने अनेक संस्था नाराज आहेत . नायर मध्ये कामगार पुरवण्याचे काम खाजगी कंपन्यांना देण्या ऐवजी बेरोजगार व सेवा संस्थांना देण्याची मागणी केली आहे .
बेरोजगार संस्थांचे पदाधिकारी यांनी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉक्टर संजीव कुमार आणि उपायुक्त संजय कुऱ्हाडे यांची भेट घेऊन चाललेल्या प्रकार थांबवण्यासाठी विनंती केली आहे . परंतु काही वरिष्ठांना या प्रकारच्या कंपन्यांकडून कंत्राट कामाचे निविदा आणून मलिद्याची वाट सुरू करावयाची असल्याचे सांगितले जाते .
फ