ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

अखेर अनिल देशमुख जामिनावर सुटले

मुंबई – तपासाच्या नावाखाली वारंवार अनिल देशमुखांच्या जामिनाला विरोध करून त्यांना जवळपास सव्वा वर्ष तुरुंगात डांबून ठेवणाऱ्या सीबीआयला यावेळी मात्र अपयश आले आणि अनिल देशमुखांच्या जामिनाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्याने अखेर आज अनिल देशमुख यांची जामिनावर सुटका झाली . तुरुंगाबाहेर येताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले

एक वर्ष आणि दोन महिन्यानंतर अनिल देशमुख तुरुंगाबाहेर आले आहेत. अनिल देशमुख यांचे कुटुंबिय तुरुंगाबाहेर आले होते. त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेतेही आले होते. यामध्ये अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांचा समावेश आहे. अनिल देशमुख बाहेर येणार, हे निश्चित झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. त्याशिवाय आर्थर रोड तुरुंगाबाहेर कार्यकर्ते जमले होते. देशमुख यांच्या नागपूर येथील घराबाहेरही कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची आर्थर रोड कारागृहातून सुटका झाली आहे दिवसांच्या स्थगितीत जामीनाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात सीबीआयला अपयश आलं. सीबीआयला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला. त्यामुळे अनिल देशमुख यांची सुटका झाली. न्यायालयावर विश्वास असल्याची प्रतिक्रिया अनिल देशमुख यांच्या कुटुंबियांनी दिली. अनिल देशमुख कारागृहाबाहेर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी अनिल भाऊ आगे बडो, हम तुम्हारे साथ है… अशा घोषणा दिल्या.

error: Content is protected !!