ओरिसात आरोग्य मंत्र्याची गोळ्या घालून हत्या
भुवनेश्वर – ओरिसा मध्ये एका पोलीस अधिकाऱ्याने राज्याचे आरोग्य मंत्री लांब किशोर दास यांची गोळ्या घालून हत्या केली . या हत्येमुळे ओरिसात एकाच खळबळ माजली असून या प्रकरणी आरोपी पोलीस अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे
ओडिशाचे आरोग्य मंत्री नबा दास यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रविवारी दुपारी झारसुगुडा जिल्ह्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने त्यांच्यावर गोळीबार केला. यादरम्यान त्यांच्या छातीत गोळी लागली होती. अपोलो रुग्णालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, गोळी लागून जखमी झालेले ओडिशाचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री नबा किशोर दास यांची प्राणज्योत मालवली आहे. या घटनेनंतर देशात खळबळ उडाली असून राज्याने मोठा नेता गमावल्याचे बोलले जात आहे.
झारसुगुडा जिल्ह्यातील ब्रजराजनगर शहरात दुपारी एकच्या सुमारास दास एका सभेसाठी जात असताना ही घटना घडली. सहायक पोलीस उपनिरीक्षक (एएसआय) गोपाल दास यांनी मंत्र्यांवर गोळीबार केला. यावेळी मंत्री गंभीर जखमी झाले. यानंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, त्यांची प्रकृती पाहता त्यांना भुवनेश्वरच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्यांचा मृत्यू झाला.