ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

भोंदू धीरेंद्र शास्त्रींची तुकाराम महाराजांवर टीका

भोपाळ – दुसऱ्याचा भविष्यकाळ आणि भूतकाळ सांगण्याची बतावणी करणारा मध्य प्रदेशातील भोंदू धीरेंद्र शास्त्री बाबा याने याने तुकाराम महाराजांवर टीका करताना तुकारामांना रोज त्यांची पत्नी मारायची असा भयंकर जावई शोध लावला आहे त्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून या भोंदू बाबाला फाटकवण्याची वेळ आली आहे अशी संतापात प्रतिक्रिया महाराष्ट्रातील जनतेने व्यक्त केली आहे

आधी आपल्या चमत्काराच्या दाव्यामुळे अडचणीत आलेले बागेश्वर धामचे पीठाधीश धीरेंद्र कृष्ण शास्त्री आता नव्या वादात अडकले आहेत. संत तुकाराम महाराज यांना त्यांची पत्नी रोज मारहाण करायची. म्हणूनच त्यांनी देवाचा धावा घेतला, अशी मुक्ताफळे धीरेंद्र शास्त्री यांनी उधळली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांना ‘शिंदेशाही’ पगडी वरुन इशारा दिला आहे.
धीरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्याचा संभाजी ब्रिग्रेडचे नेते संतोष शिंदे यांनी खरपूस समाचार घेतला आहे. शिंदे म्हणाले, “जगदगुरु संत तुकाराम महाराजांची बदनामी करणारे बागेश्वर धाम नावाचा भोंदू बाबा तु पहिली शिंदेशाही पगडी काढ, तुझी पात्रता नाही शिंदेशाही, होळकरशाही पगडी घालायची. ही स्वराज्याच्या मावळ्यांची पगडी आहे. शिंदेशाही, होळकर शाही’ची पगडी घालून चमत्कार करणाऱ्याला, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची बदनामी करणाऱ्याला संभाजी ब्रिगेड सोडणार नाही”, असा थेट इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे. वारकरी, स्वयंघोषित पक्षाच्या अध्यात्मिक आघाड्या झोपल्या की काय? असा प्रश्न देखील संतोष शिंदे यांनी विचारला आहे.

error: Content is protected !!