यवतमाळच्या शिवभोजन केंद्रात गरिबांची किळसवाणी थट्टा
शिवभोजान थाळीसाठी शौचालयाचे पाणी
यवतमाळ / शिवसेनेची अत्यंत ड्रीम योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवभोजण थाळी बाबत एक भयंकर वास्तव समोर आले आहे .पाण्याची टंचाई असल्याचे कारण सांगून शीवभोजन केंद्रातील शिवभोजन् थाल्या चक्क शौचालयाच्या पाण्याने धुतल्या जात आहेत हा प्रकार उघडकीस येताच सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत
गोरगरीब जनतेसाठी शिवसेनेच्या प्रयत्नातून महाविकास आघाडी सरकारने शिवभोजन थाळी सुरू केली होती केवळ दहा रुपयांत ही शिव भोजन थाळी मिळत होती त्यासाठी सरकारकडून शिव भोजन केंद्रांना मोठे अनुदान दिले जात होते करोना काळामध्ये तर ही शिवभोजन थाळी5 रुपयांना दिली जात होती आणि या थाळीचा गरिबांना मोठा आधार होता मात्र शिव भोजन केंद्रांमध्ये आवश्यक ती स्वच्छता पाळली जात नाही अशा तक्रारी सुधा येत होत्या पण त्याकडे सरकारने पुरेसे लक्ष दिले नाही त्यामुळे एक भयंकर आणि तितकाच किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथील एका शिवभोजन केंद्रात चक्क शौचालयाच्या पाण्याने शिवभोजन थाळी धुतली जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून या थळीतील पदार्थ सुधा याच पाण्याने बनवले जात असल्याची चर्चा आहे त्यामुळे सरकारने या भयंकर प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून या शिवभोजन केंद्र चालवणाऱ्या वर कठोर कारवाई केली जाणार आहे