ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

कोरोनाची पुन्हा चाहूल

मुंबई -तब्बल दीड वर्ष ज्या कोरोनाने संपूर्ण जगाचे जनजीवन आणि अर्थव्यवस्था उध्वस्त करून टाकली त्याने पुन्हा एकदा आपल्या दारावर टक टक करायला सुरुवात केली आहे .अशावेळी गेल्या दीड वर्षात जे लोकांनी भोगले ते पुन्हा नशिबी येऊ नये यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून जनतेला सावध केले जात आहे.लसीकरण आणि मास्क किती आवश्यक आहे हे सांगितले जात आहे.अशावेळी सरकारच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे एक प्रकारे कोरोनाला निमंत्रण देण्यासारखे आहे.विज्ञानाच्या जोरावर जगाने कोरोणावर मात केली हे खरे असले तरी कोरोनाचे संपूर्ण उच्चाटन होण्यापूर्वीच करोना गेला अशी समजूत करून घेऊन आपण सर्व निर्बंध हटवून पूर्वीसारखे कामाला लागलो .यात कुठेतरी आपली आणि सरकारची सुधा चूक झाली होती हे आता आपल्या लक्षात आले आहे. भारता पुरते बोलायचे झाले तरी भारतात जवळपास 4 लाख लोकांचा कोरोणाने बळी घेतला होता .शिवाय कोरोना काळात लागलेले लोकडाऊन आणि त्यामुळे बंद पडलेले उद्योग धंदे याने आर्थिक नुकसान झाले ते वेगळेच!पण त्याही पेक्षा लोकांना जो मानसिक त्रास भोगावा लागला त्याच्या आठवणीने अंगावर शहारे येतात.आणि म्हणूनच प्रत्येक जण ईश्वराकडून हीच प्रार्थना करीत आहेत .

error: Content is protected !!