ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईविश्लेषण

खरे महाराष्ट्र भूषण आजही दारिद्रयात –

1 मे हा महाराष्ट्र दिन कारण 1 मे 1960 साली महाराष्ट्र हे नवे राज्य अस्तित्वात आले. इथल्या मराठी माणसाला मुंबईसह महाराष्ट्र मिळाला पण तो मिळवण्यासाठी ज्या 105 हुतात्म्यांनी रक्त सांडले. ज्या लोकशाहीर मंडळींनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ घराघरात पोचवून लोकांना जागे केले. त्या शाहिरांची आज काय अवस्था आहे याची सरकारला कल्पना आहे का? शाहीर साबळे, शाहीर अमर शेख, शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी डफावर थाप दिली नसती आणि महाराष्ट्र द्वेशट्यांचे कपडे उतरवले नसते तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला तलवारीची धार आली नसती. मराठी माणसाला मुंबईसह महाराष्ट्र कधीच मिळाला नसता. स्वतंत्र महाराष्ट्रासाठी जितके सेनापती बापट,प्रबोधनकर ठाकरे,आचार्य अत्रे ,एस एम जोशी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर ,को.डांगे यासारख्या महापुरुषांचे योगदान आहे. तितकेच योगदान महाराष्ट्राच्या श्रेय कलेतील कलावंतांचे आहे. मग ते तमासगीर असोत की कीर्तनकार असोत,की शाहीर असोत. या सर्वांनी हातात हात घालून संयुक्त महाराष्ट्रासाठी रक्त सांडले पण या लोकांचे कुठेच नाव नाही .त्यांचे हयात वारसदार आज काय करतायत कस जगतायत याची सरकारला पडलेली नाही. शाहीर आत्माराम पाटील, शाहीर जंगम,शाहीर डांगे ,शाहीर जैनु शेख ही सगळी मंडळी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा एक भाग होती. पण आज त्यांचे वारसदार दुर्लक्षित आहेत. शाहीर अण्णाभाऊ साठे आणि शाहीर अमर शेख यांना खरे तर मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळायला हवा होता.पण त्यांचे नातेवाईक पैसेवाले नाहीत, त्यांच्या मागे हजारो अंध भक्त नाहीत मग त्यांनी सांडलेल्या रक्ताला काय किंमत असेल.संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा देशाच्या स्वातंत्र्य लढ्या इतकाच मोठा होता.कारण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जी भाषावार प्रांतरचना झाली त्यात फाजल कमिशन ने मराठी भाषिकांवर अन्याय केला. निजामाच्या हैद्राबादला एकभाषिक दर्जा मिळाला. पण मराठी मूलकाला द्विभाषिक ! शिवाय कारवार,बेळगाव,निपाणी ,बिदर हा मराठी मुलुख महाराष्ट्रापासून तोडण्यात आला .मुंबई महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची असूनही त्यावेळचे काँग्रेसवाले सताधारी नेहरू आणि महाराष्ट्रातले मोरारजी आणि स. का. पाटलांसारखे त्यांचे दलाल मुंबई महाराष्ट्राला मिळू नये यासाठी देव पाण्यात बुडवून बसले होते. मोरारजी म्हणत होता जोवर काँग्रेस आहे तोवर मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही तर स.का.पाटील म्हणत होता की चंद्र सूर्य गगनात असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. पण या दोघांच्याही उरावर पाय रोवून तसे त्यांच्या गोळ्या छातीवर झेलून 105 हुतात्म्यांचे बलिदान देऊन मराठी माणसाने मुंबई सह महाराष्ट्र मिळवला आणि या इतिहासात शहीरांचे योगदान मोलाचे आहेत ते खरे महाराष्ट्र भूषण आहेत. पण सरकारला त्यांचाच विसर पडला. सरकार मध्ये बसलेले जरी नमक हराम निघाले तरी महाराष्ट्रातली जनता शाहिरणा विसरणार नाही.
1 मे हा जसा महाराष्ट्र दीन आहे तसच कामगार दिन सुधा आहे. पण आज महाराष्ट्रातल्या कामगारांची शेतमजुरांची शहरातल्या कष्टकर्‍यांची वाईट अवस्था आहे.सरकारी सेवांमध्ये जेमतेम 4 तास काम करून लाखो रुपये तिथल्या कर्मचार्‍यांना मिळतात पण जे माथाडी कामगार आहेत,जे स्टेशनवर हमाली करतात जे कारखान्यांमध्ये 12/ 12 तास ड्युटी करतात. त्यांना महिन्याला 10/12 हजार सुधा मिळत नाहीत सध्याच्या महागाईच्या काळात अशा लोकांनी कसे जगायचे. महाराष्ट्रातील असंघटित कामगारांचे जीवन भयंकर खडतर बनले आहे .इथल्या राज्यकर्त्यांनी गिरणी कामगारांचा संप मोडून काढला आणि गिरण्यांच्या जागा बिल्डरांच्या घशात घालून मुंबईची खरी ओळख असलेल्या इथल्या गिरणी कामगाराला उध्वस्त करून मुंबई बाहेर घालवले आणि तेच लोक आज 1मे हा महाराष्ट्र आणि कामगार दीन म्हणून साजरा करायला पुढे असतील. त्यामुळे अशा लोकांच्या सावलीलाही कुणी उभे राहू नये हीच खरी संयुक्त महाराष्ट्रासाठी हुतात्मा झालेल्यांना श्रद्धांजली ठरेल!

error: Content is protected !!