ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

मागाठाणेत पंतप्रधान मोदींच्या-१०० व्या मन की बात’ चे आयोजन

केंद्रीय मंत्री पियुष गोयलही उपस्थित राहणार

मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या लोकप्रिय कार्यक्रमाचा १०० वा भाग उद्या रविवार, ३० एप्रिल २०२३ रोजी प्रसारित होणार आहे. पंतप्रधान मोदी मन की बातमधून आपले विचार देशातील जनतेसमोर मांडणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी आपल्या मागाठाणे मतदार संघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार ऐकण्यासाठी ‘१०० व्या मन की बात’ चे थेटप्रक्षेपण आयोजित केले आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री पियुष गोयल हेही उपस्थित राहणार आहेत. जनतेने मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन आ. दरेकर यांनी केले आहे.

मागाठाणे विधानसभा मतदारसंघात उद्या रविवारी सकाळी १० वाजता ‘दिल से दिल तक १०० वी मन की बात’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ठाकूर बँक्वेट हॉल, दुसरा मजला, अंगण सोसायटी समोर, ठाकूर व्हिलेज, कांदिवली( पूर्व) येथे प्रज्ञावंतांसोबत, केतकीपाडा-प्रदीप अभ्यासिका-शिवाजी चौक-ईश्वर नगर फुलपाखरू उद्यान-अनंतराव भोसले मैदान-ठाकूर बँक्वेट हॉल-नालंदा बुद्ध विहार येथे घरेलू कामगारांसोबत, कॉसमॉस हायस्कुल, काजूपाडा, बोरिवली (पूर्व) येथे रिक्षाचालकांसोबत, चिंचपाडा संजय गांधी उद्यान येथे आदिवासिंसोबत, कांदिवली दामूनगर येथे मुस्लिम बांधवांसोबत, आजी-आजोबा उद्यान, अशोकवन दहिसर येथे ज्येष्ठ नागरिकांसोबत, अस्मिता सेवा केंद्र अशोकवन, बोरिवली येथे दिव्यांगांसोबत, सोलापूर मित्र मंडळ, आकुर्ली रोड, कांदिवली (पूर्व) येथे अंगणवाडी सेविकांसोबत, प्रदीप अभ्यासिका, कोकणीपाडा, दहिसर येथे विद्यार्थ्यांसोबत, अनंतराव भोसले मैदान, जय महाराष्ट्र नगर केतकीपाडा येथे पापड उद्योग महिलांसोबत आणि केतकीपाडा येथील सफाई कर्मचाऱ्यांसोबत ‘मन की बात’ हा कार्यक्रम साजरा केला जाणार आहे.

चौकट

केंद्रीय मंत्री पियुष गोयल
श्रोत्यांशी सुसंवाद साधणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १०० वा ‘मन की बात’ कार्यक्रम झाल्यानंतर केंद्रीय मंत्री पियुष गोयल घरकाम करणाऱ्या महिला, रिक्षा चालक व ज्येष्ठ नागरिक या तीन ठिकाणी जाऊन श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. अनुक्रमे ठाकूर व्हिलेज येथे दुपारी १२ वाजता, अशोकवन आजी-आजोबा उद्यान येथे १२.१५ वाजता आणि नॅशनल पार्क मैदान येथे दुपारी १२.३० वाजता जाऊन केंद्रीय मंत्री गोयल संवाद साधणार आहेत, अशी माहिती आ. दरेकर यांनी दिली.

error: Content is protected !!