ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

चंद्रकांत खैरे यांना वंचित कोर्टात खेचणार

औरंगाबाद – आपला पराभव करण्यासाठी एम आय एम आणि वंचित बहुजन आघाडीने भाजपकडून १ हजार कोटी घेतले असा गंभीर आरोप करणाऱ्या चंद्रकांत खैरे यांना वंचित बहुजन आघाडी कोर्टात खेचणार आहे असे वंचितचे प्रवक्ते फारुख अहमद यांनी सांगितले आहे . त्यामुळे औरंगाबाद मध्ये वंचित आणि शिवसेना यांच्यात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि इम आय एम पक्षाची युती होती आणि या युतीकडून इम्तियाज जलील यांनी निवडणूक लढवली होती . तर शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे यांनी निवडणूक लढवली होती . मात्र या निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला होता. हा पराभव खैरे यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता . दरम्यान आपला पराभव करण्यासाठी मोठे षड्यंत्र रचण्यात आले होते . आणि त्यासाठी भाजपने एम आय एम आणि वंचित बहुजन आघाडीला १ हजार कोटी दिले होते असा गंभीर आरोप खैरे यांनी केला आहे. त्यामुळे वान्चीत्मध्ये संतापाची लाट उसळली असून आम्ही पैसे घेतल्याचे खैरे यांनी पुरावे द्यावे अन्यथा त्यांच्यावर आम्ही मानहानीचा दावा दाखल करणार आहोत असे वंचित चे प्रवक्ते त अहमद यांनी सांगितले ते पुढे म्हणाले कि माणसाला बोलण्याचे स्वातंत्र्य जरी असले तरी कोणावरही बिनबुडाचे आरोप करण्याचे स्वातंत्र्य नाही त्यामुळे खैरे यांनी मान्हानीच्या खटल्याला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी असेही फारुख यांनी म्हटले आहे. दरम्यान याबाबत एम आय एम पक्षाने अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही पण खैरे यांच्या आरोपामुळे वंचित आणि शिवसेना यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे आता खैरे याबाबत कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे .

error: Content is protected !!