ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

नवे संसद भवन हे १४० कोटी देश वासियांच्या आकांक्षाचे प्रतीक -मोदी

नव्या संसद भवनाचा दिमाखदार उद्घाटन सोहळा
दिल्ली/ राष्ट्रपती मूर्मू याना आमंत्रण नसल्याने वादाचा मुद्दा बनलेल्या नव्या संसद भवनाचे रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन झाले. वास्तुकलेचा सुंदर नमुना असलेले हे भवन अप्रतिम असून त्यात लोकसभेच्या 800 आणि राज्यसभेच्या 384 आसन व्यवस्था आहेत. शिवाय दोन्ही सभागृह आणि सेंट्रल होल तसेच आणि इतर दलनांमधे अत्याधुनिक ध्वनी सिस्टीम आहे.९८० कोटी खर्चून बांधलेल्या या संसद भवनात विविध धर्माच्या साधू संतांनी पूजा अर्चा केली. सेंघाल म्हणजेच राजदंड पूजन करण्यात आले मोदींनी साष्टांग दंडवत घालून सेंघलचे पूजन केले. त्यानंतर सर्व उपस्थितांना संबोधित करताना मोदींनी सांगितले की 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे प्रतिबिंब असलेली ही वास्तू आत्मनिर्भर भारताची साक्षीदार आहे
या उद्घाटन समारंभ वर काँग्रेस सह 20 पक्षांनी बहिष्कार टाकला होता तर २५ पक्षाचे खासदार उद्घाटनाला हजर होते.

error: Content is protected !!