विधानसभेचे विशेष अधिवेशन महाविकास आघाडीची अग्निपरिक्षा
मुंबई/ एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी नंतर महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आहे . त्यामुळे विरोधी पक्ष नेते फडणवीस यांनी राज्यपालांना भेटून बहुमत चाचणीची मागणी केली आहे .त्यामुळे राज्यपालांनी शुक्रवार दिनांक 30 जूनला विधानसभेचे एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावले असून या आधिवेशनात बहुमत चाचणी होणार आहे. .बहुमतासाठी 125 आमदारांची गरज आहे भाजपकडून स्वतःचे 106 तसेच 13 अपक्ष आहेत त्यांना आणखी 6 आमदारांची गरज आहे पण हे सर्व गणित यापूर्वीच जुळवण्यात आले आहे .त्यामुळे शिंदे गटाने भाजपला पाठींबा दिलं नाही तरी भाजप बहुमत चाचणी जिंकेल तर सरकारकडे शिवसेनेचे 12 राष्ट्रवादीचे 53 त्यात मलिक देशमुखांना मतदानाचा अधिकार नाही म्हणजे 51 आणि काँग्रेसचे 44 म्हणजे 107 आमदार आहेत बहुमतासाठी त्यांना 18 आमदारांची गरज आहे त्यामुळे कोण बाजी मारणार हे उद्या सभागृहात कळेल .