ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामहाराष्ट्रमुंबई

कुर्ला इमारत दुर्घटनेला पालिका जबाबदार मृतांची संख्या22


मुंबई/ मुंबईत 337 धोकादायक इमारती आहेत आणि पालिकेने त्यांना नोटीस सुधा बजावली आहे पण पालिकेची तेवढीच जबाबदारी आहे का ? कारण धोकादायक इमारतीत राहणाऱ्या लोकांना पर्यायी जागा उपलब्ध करून देणे आणि पोलिसांच्या मदतीने त्या इमारती खाली करून घेणे ही सुधा पालिकेची जबाबदारी आहे पण अशा धोकादायक इमारतींना नोटीस देऊन आपले हात झटकणाऱ्या पालिकेचे अधिकारी सुधा अशा इमारत दुर्घटना जबाबदार आहेत
धक्कादायक बाब म्हणजे जी इमारत कोसळली त्या इमारतीत काही मजूर राहत होते आणि तिथल्या दलालांनी 3 हजार रुपये भाडे घेऊन या धोकादायक इमारतीमधील खोल्या त्या मजुरांना भाड्याने दिल्या होत्या अशी माहिती तिथल्या लोकांकडून उघडकीस आली आहे त्यामुळे हे दलाल कोण आणि याबाबतची पालिका अथवा पोलिसांना माहिती नव्हती का असा प्रश्न उपस्थित केला जातोय त्यामुळे या प्रकरणी स्थानिक पोलीस आणि एल विभागाचे वार्ड ऑफिसर तसेच एल विभागाच्या इमारत आणि कारखाना विभागातील अधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी करावी अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. कारण ज्या इमारतीला पालिकेने धोकादायक ठरवून त्याचे वीज पाणी तोडली होती त्या इमारतीत भाड्याने मजूर कसे राहत होते .आणि त्यांना भाड्याने तिथे ठेवणाऱ्या दलालांची पालिका अथवा पोलीस प्रशासनाला माहिती नव्हती का ? आणि माहिती होती तर त्यांनी कारवाई का केली नाही असा सवाल तिथले लोक विचारात आहेत.

error: Content is protected !!