एकाच घरात दोन दोन कायदे का – मोदींकडून समान नागरी कायद्याचे समर्थन
भोपाळ/एकाच घरात जेव्हा दोन दोन कायदे असतात त्यावेळेला ते घर व्यवस्थित चालू शकत नाही असे म्हणून पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा एकदा समान नागरी कायद्याची वकालत केली आहे.
भोपाळ मध्ये भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मोदींनी सांगितले की देशामध्ये मुस्लिमांना काही पक्षांकडून भीती दाखवली जात आहे परंतु प्रत्यक्षात तसे नाही उलट मुस्लिम माहिती आजची स्थिती खूपच वाईट आहे आणि याला जबाबदार आहेत मुस्लिम करणारे इथले राजकीय पक्ष या पक्षांनी नेहमीच मुस्लिम समाजाला भीती दाखवत आपला स्वार्थ साधला त्यामुळे मुस्लिम समाज आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागे राहिला पण त्याबद्दल कुणी काही बोलायला तयार नाही उलट सतत मुस्लिमांना हिंदूंची भीती दाखवून दहशतीच्या छायेखाली ठेवले जात आहे आपला देश काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि गुजरात पासून मणिपूर पर्यंत एक संघ आहे त्यामुळे देशात एकच एक कायदा असायला हवा जे लोक युनायटेड सिविल कोडला विरोध करीत आहेत त्यांना देशांमध्ये ऐक्य नको त्यांना देशात विविध जाती धर्माच्या लोकांमध्ये विभान हवे आहे अशा शब्दात नरेंद्र मोदी यांनी युसीसी चे समर्थन करीत देशाला समान नागरी कायद्याची का आवश्यकता आहे हे स्पष्ट केले यावेळी त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीवर कडाडून हल्ला केला आणि सांगितले की जर तुम्हाला नेत्यांच्या मुलाबाळांची भले व्हावे असे वाटत असेल तर काँग्रेस राष्ट्रवादी समाजवादी पार्टी यांना मत द्या आणि जर तुम्हाला तुमच्या मुलाबाळांचे भले व्हावे असे वाटत असेल तरच भाजपला बद्दल राष्ट्रवादी च्या अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्यांचा आरोप आहे असेही त्यांनी सांगितले