ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

पालिकेची आरक्षण सोडत जाहीर अनेक दिग्गजांना मोठा धक्का- ओबिसिसाठी 63 प्रभाग राखीव


मुंबई/ सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींना राजकीय आरक्षण दिल्यामुळे काल दुसऱ्यांदा मुंबई महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे त्यात ओबीसी साठी 63 वार्ड राखीव झाल्याने विरोधी पक्ष नेते रवी राजा राष्ट्रवादीच्या गट नेत्या राखी जाधव माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर भाजपचे गट नेते प्रभाकर शिंदे यांचे वार्ड राखीव झाल्याने त्यांना आता दुसरे वार्ड शोधावे लागणार आहेत
आज बालगंधर्व रंग शरद सभागृहात प्रभाग आरक्षण सोडत काढण्यात आली त्यानुसार 236 वार्ड पैकी महिलांसाठी 118 वार्ड राखीव,अनुसूचित जातींसाठी 15 त्यात महिला 8 तर अनुसूचित जमातीसाठी 2 त्यात महिला 1,ओबिसिंसाठी 63त्यात ओबीसी महिलांसाठी 32, सर्वसाधारण वर्गासाठी 156 सर्वसाधारण महिलांसाठी 77 असे आरक्षण पडले आहे यात विरोधी पक्ष नेते रवी राजा यांचा वार्ड क्रमांक 182 ,भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदेंचा वार्ड 109,राष्ट्रवादीच्या गट नेत्या राखी जाधव यांचा वार्ड 130,विश्वनाथ महाडेश्वर यांचा वार्ड 96,यशवंत जाधव यांचा वार्ड 217 आणि सेनेच्या तृष्णा विश्वासराव यांचा वार्ड 185 हे वार्ड राखीव झाल्याने याना आता नवे वार्ड शोधावे लागतील .
30 जुलै रोजी आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करण्यात येणार आहे आरक्षण सोडतिवर 30 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत हरकती व सूचना स्वीकारण्यात येतील आणि 5 ऑगस्टला अंतिम आरक्षण सोडत राजपत्रात प्रसिद्ध केली जाईल नागरिकांनी मुंबई महा पालिकेच्या24 विभाग कार्यालयात आपल्या हरकती व सूचना सादर करता येतील असे पालिकेने सांगितले
ओबीसी साठी राखीव असलेले वार्ड(पुरुष)/३,७,९,१२,१३,२७,३०,३८,४०,४२,४८,५१,५३,६२,७६,७९,८१,८७,८९,१०१,११७,१२८,१२९,१३२,१३५,१३७,१४६,१४७,१४८,१५०,१५२,१५४,१५५,159,161,164,174,179,180,183,185,188,195,200,202,203,217,218,222,223,230,236,17,
82,96,93,16,127,98,61,173,130
ओबीसी ( महिला) 185,188,79,17,9,48,161,13,179,38,217,152,129,30,159,87, 7,96,,130,51,180,117,89,
98,202

शिवसेनेचे अमेय घोले, काँग्रेसचे नेते आणि मनपातील विरोधी पक्षनेते रवी राजा, भाजपचे प्रभाकर शिंदे यांना आपला वॉर्ड गमवावा लागल्याचं दिसत आहे. शिवसेना नेते आशिष चेंबूरकर यांचा वॉर्ड हा अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने त्यांनाही मोठा धक्का बसला आहे. तर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना आरक्षण सोडतीत दिलासा मिळाला आहे. त्यांचा प्रभाग क्रमांक 206 हा सर्वसाधारण झाला आहे.

error: Content is protected !!