दिल्लीवरून फोन येताच राणेंचा आवाज बंद! — अटक आणि राडे बाजीच्या गाल बोटानंतर जन आशीर्वाद यात्रेचा समारोप
वेंगुर्ले/ शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांची राडेबाजी आणि राणेंची अटक यामुळे गाजलेल्या राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेचा काल सिंधुदुर्गात समारोप झाला.मात्र दिल्ली वरून फोन आल्यामुळे राणेंचे शिवसेना वर प्रहार थांबले आहेत .पण सामना मधील टीकेला प्रहार मधून उत्तर देणार असे राणेंनी जाहीर केलेले आहे
मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारण्याची राणेंनी केलेली भाषा भाजपतील अनेक बड्या नेत्यांनी आवडलेली नाही खास करून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना तर अजिबात आवडली नाही त्यामुळे त्यांनी याबाबतची माहिती भाजप च्या केद्रीय नेतृत्वाला दिली आणि अशा गोष्टींमुळे भाजपची प्रतिमा खराब होण्याची भीती व्यक्त केली त्यामुळे भाजपचे केंद्रीय नेतृत्व सावध झाले कारण अगोदरच राणेंना अटक झाल्यामुळे केंद्र सरकारची नाचक्की झाली होती.कारण एका केंद्रीय मंत्र्याला काही तासांसाठी का होईना विरोधी पक्षाच्या सरकारने अटक करून दाखवली हे भाजपची मानहानी करणारे होते त्यामुळे राज्यातील काही भाजप नेते राणेंवर नाराज आहेत त्यांनीही केंद्रीय नेतृत्वाचे कान फंकल्याचे समजते त्यानंतर केंद्रातून राणेंना फोन करून अशी भाषा यापुढे वापरू नका अशी समाज देण्यात आली त्यामुळे राणेंचा सुर बदलला आणरा उद्व ठाकरे हे काही माझे शत्रू नाहीत पण मला चुकीच्या पद्धतीने अटक करण्यात आली असा राणेंनी खुलासा केला दरम्यान काल सिंधुदुर्गात राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले पण त्याच बरोबर देवगड,कुडाळ,कणकवली आदी ठिकाणी शिवसेना कार्यकर्त्यांनी राणेंच्या विरुद्ध घोषणा दिल्या तर नर्डवे येथील शिवसेनेच्या शाखेत मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक जमले होते त्यामुळे तेथे तणावाची स्थिती होती मात्र पोलिसांनी योग्य खबरदारी घेतल्याने पुढील अनुचित प्रकार टळला दरम्यान काल रणे यांनी कणकवलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेनेची अधोगती सुरू असल्याचे सांगितले जन आशीर्वाद यात्रेत मांजर आडवे गेले अपशकून झाला तरी यात्रा व्यवस्थित झाली .राष्ट्रवादी कडे मी अजून आलो नाही अजितदादा अज्ञानी एका रात्रीत कसे निर्णय बदलावेत हे अजित पवारांकडून शिकावे .मला झालेली अटक ही सूडबुद्धीने झालेली होती पण मी त्यांना घाबरणारा नाही पक्ष आणि पक्षाचे नेते माझ्या पाठीशी आहेत मोदींमुळे मला मंत्रिपद मिळाले याच त्यांनी पूनरवृच्चार केला
बॉक्स/..तर संघर्ष अटळ/दीपक केसरकर
आम्ही १७ सप्टेंबर पर्यंत वाट बघतोय त्यानंतरही राणेंच्या भूमिकेत बदल झाला नाही तर मात्र त्यांच्याशी राजकीय संघर्ष अटळ आहे असा इशारा शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी दिला त्याच बरोबर आता त्यांची भाषा काहीशी बदलली आहे याबाबत आपण न्यायालयास धन्यवाद देतो असेही त्यांनी सांगितले दीपक केसरकर यांच्या या इशारा मुळे सिंधुदुर्गात राणे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष अटळ आहे