नेरळमधे पैशाने भरलेली पर्स रेल्वे कर्मचाऱ्यांनी केली परत! सीसीटीसी विनोद दळवी यांचाच प्रामाणिकपणाचे कौतुक!
रायगड(धर्मानंद गायकवाड):- कर्जत तालुक्यांतील मध्य रेल्वेचा नेरळ येथिल रेल्वे स्टेशन नंबर ३ वर बुकिंग ॲाफीसवर आज मुंबई हायकोर्टाचे वकील ॲड. गिताबाई साळुंखे यांची पैशाने भरलेली पर्स आणि त्या मध्ये असलेले डेबिट आणि क्रेडिट कार्ड येथिल रेल्वेमध्ये कार्यरत असणारे कर्मचारी श्री. विनोद दळवी यांच्या मार्फत त्यांना नुकताच सुखरुप मिळाली आहे. त्यामुळे नेरळ स्टेशन व परीसरात सर्वत्र रेल्वे कर्मचारी विनोद दळवी (सीसीटीसी)यांचे कौतुक होत आहे.
या बाबत अधिक माहीती अशी की, ॲड. गिताबाई साळुंखे या नेरळ रेल्वे स्थानकावर पास काढत असताना त्यांना घाई असल्साने त्यांची मनीपर्स त्या तेथेच विसरुन गेल्या होत्या. ॲड. साळुंखे या तेथुन गेल्यानंतर त्यांची पर्स तेथेच राहील्याचे येथिल सीसीटीसी विनोद दळवी यांच्या ही बाब लक्षात आली होती. काही कालाने आपली पर्स विसरल्याचे साळुखे यांच्या लक्षात येताच त्यांनी तेथे येवुन विचारपुस केली असता सदर पर्स त्यांना सुखरुप परत मिळाली आहे. त्यामुळ ॲड. साळुंखे यांनी सीबीएस नेरळ यांना पत्र देवुन रेल्वे कर्मचारी श्री. विनोद दळवी यांचा प्रामाणिकपणाचा अभिमान वाटतो असे कळवुन कौतुक केले आहें.
दरम्यान सध्याचा धावपळीचे आणि या महामारीचा युगात ईतका प्रामाणिकपणाचे वातावरण राहीले नसतानाच रेल्वे कर्मचारी विनोद दळवी यांचा सारखे कर्मचारी रेल्वे सेवेत प्रामाणिकपणे ईमानईतबारे अशी सेवा बजावत असल्यानेच रेल्वे वरील विश्वास जनतेचा वाढत आहे. अनोळखी व्यक्तींची पर्स मिळालेल्या अवस्थेत सुखरुप परत करणेचे प्रामाणिक कार्य दळवी यांनी केल्याने त्यांचे संपुर्ण नेरळ शहरात कौतुक होत आहे. त्यामुळे त्यांचा या प्रामाणिक कार्यांचे सर्व स्तरावरुन स्वागत होत आहे.
नेरळ रेल्वे स्थानकात सीसीटीसी पदावर कार्यरत असणारे रेल्वे कर्मचारी श्री. विनोद दळवी यांना येथे ॲड. साळुंखे यांची मिळालेले मनी पर्स सुखरुप परत करताना सीसीटीसी विनोद दळवी छायाचित्रांत दिसत असुन सोबत नेरळ रेल्वे स्थानकातील आरपीएफ जवान व रेल्वे कर्मचारी दिसत आहेत.