अजित दादांच्या विरोधात चंद्रकांत पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
मुंबई/अजित दादा पवार हे अर्थमंत्री झाल्यापासून महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारमध्ये त्यांना त्यांनी सुरू झाली आहे अजित दादांना अर्थमंत्री पद देण्यास सुरुवातीपासूनच भाजपातील काही निष्ठावंतांचा तसेच शिवसेनेतील शिंदे गटाच्या लोकांचाही विरोध होता परंतु हा सर्व विरोध अजित दादांना अर्थमंत्री पद देण्यात आले मात्र अर्थमंत्री पद मिळताच अजितदादांनी भाजपातल्याच निष्ठावंतांना आपला इंगा दाखवायला सुरुवात केली आहे त्यामुळे भाजपातील निष्ठावंतांमध्ये अजित दादा विरुद्ध पुन्हा असंतोष उफाळून येण्याची शक्यता आहे भाजपाचे मोठे नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघासाठी अजित दादाने पुरेसा निधी उपलब्ध करून दिला नाही यामुळे चंद्रकांत पाटील प्रचंड संतापले आहे आणि त्यांनी याबाबत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केलेली आहे केवळ चंद्रकांत पाटीलच नव्हे तर इतरही भाजपचे काही नेते अजित दादांवर नाराज आहेत तर दुसरीकडे शिवसेनेच्या शिंदे गटातील नेत्यांनी यापूर्वीच अजित दादांना विरोध केलेला आहे त्यामुळे महायुती अजित दादांच्या विरोधात एक मोठी लॉबी उभी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही