ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हे

साकीनाका बलात्कार प्रकरणी आरोपीवर चार्जशीट दाखल


मुंबई/ संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या साकीनाका बलात्कार प्रकरणात आरोपी मोहन चौहान याच्यावर दिंडोशी सत्र न्यायालयात ३४६ पाणाचे आरोपपत्र दाखल करण्यात आले .या खटल्यात ७७साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले असून फॉरेन्सिक व इतर सर्व सबळ पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले आहे त्यामुळे आरोपीला जास्तीत जास्त कठोर शिक्षा होण्याची शक्यता आहे .गणेश चातुर्थीच्या आदल्या रात्री साकीनाका येथील खैरणी रोडवर मोहन चौहान या नराधमाने त्या महिलेवर पाशवी बलात्कार करून तिचा गुप्तांगांत रोड घुसवला होता त्यामुळे दुसऱ्या दिवशी रुग्णालयात त्या महिलेचा मृत्यू झाला या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लात उसळली होती . स्वतः मुख्यमंत्र्यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन तातडीने तपास करून आरोपीवर लवकरात लवकर खटला दखल करण्याचे आदेश दिले होते . त्या मुळेच अत्यंत कमी कालावधीत आरोपीवर दिंडोशी सत्र न्यायालयात चार्जशीट दाखल करण्यात आली .

error: Content is protected !!