ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महापालिका

मुंबईच्या खड्ड्यांबबत पालिका आयुक्तांचे आश्वासन च खड्ड्यात!

: मुंबई/ पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी रस्त्यावरचे खड्डे तातडीने बुजवण्याचे आदेश दिल्यानंतर पालिका आयुक्तांनी याबाबत १५दिवसात पथके तयार करण्यात येतील असे सांगितले होते . पण आता मात्र दोन ते तीन आठवड्यात खड्डे बुजविण्यासाठी काम करावे लागेल असे आयुक्त म्हणत आहे .त्यामुळे आयुक्तांनी स्वतःचाच आदेश कसा खड्ड्यात घातला असे मुंबईकर म्हणत आहेत. मुंबईच्या रस्त्यावरचे ४० हजार खड्डे बुजवल्याबद्दल पालिका प्रशासन आपली पाठ थोपटून घेत आहे.पण पुन्हा पुन्हा खड्डे पडत आहेत त्याचे काय? आयुक्तांनी मात्र याबाबत पावसाला तसेच मुंबईच्या वाढत्या वाहतुकीला जबाबदार धरले आहे पण कंत्राटदारांनी निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरल्या मुळेच पुन्हा पुन्हा रस्त्यावर खड्डे पडत आहेत याबाबत पालिका आयुक्त का बोलत नाहीत किंवा रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी का लावीत नाहीत? ब्लॅक लिस्ट केलेल्या कंत्राटदारांना च पुन्हा पुन्हा रस्त्याची कामे का दिली जातात . यात पालिकेतील कोण कोणत्या अधिकाऱ्यांची आर्थिक मिली भागात आहे याची पालिका आयुक्तांनी चौकशी करून दोषींवर कारवाई करावी असे मुंबईतील अनेक ज्येष्ठ नागरिकांनी म्हटले आहे .

error: Content is protected !!