अतिवृष्टीने नुकसान झालेल्या मुख्यमंत्र्यांचा दिलासा धीर सोडू नका
मुंबई/ यंदाच्या पावसाळ्यात तीन वेळा अतिवृष्टी होऊन त्यात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे prchand नुकसान झाले आहे.नद्यांना आलेल्या पुराच्या पाण्यात गावेच्या गावे बुडाले शेतीवाडी घरदार सारेकाही उध्वस्त झाले या उध्वस्त शेतकऱ्याला सावरण्यासाठी सरकारने युद्ध पातळीवर उपाययोजना सुरू केल्या असून मुख्यमंत्र्यांनी सलग दोन दिवस बैठका घेऊन जिल्हावार नुकसानीचा आढावा घेऊन ज्यांचे नुकसान झाले आहे अशांना तातडीने मदत करण्याचे जिल्हा प्रशासनाला आदेश देत धीर सोडू नका सरकार खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असे सांगून दिलासा दिला आहे
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे.धरणे ओव्हरफ्लो झाल्याने त्यातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे नद्यांच्या पाणलोट क्षेत्रातील शेकडो गावे पाण्याखाली जाऊन त्यातील हजारो लोक विस्थापित झाले प्रार्थ्मिक माहिती नुसार यांच्या अतिवृष्टी ४३६ जणांचा मृत्यू झाला त्यातील १९६ जन वीज पडून दगावले त्याच बरोबर २२लाख हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाने मोठा हाहाकार मजला होता मुख्यमंत्र्यांनी सलग दोन दिवस अधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन मदत व पुनर्वसन विभागाकडून नुकसानीचा आढावा घेतला तसेच बचाव कार्यावर अधिक लक्ष देऊन लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचा आदेश दिले आहेत.तसेच महसूल व कृषी विभागाने तात्काळ पंचनामे सुरू करावेत असे आदेश दिले सततच्या पावसाने पिकांचे फळबागांचे मोठे नुकसान झालेले आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून एक महत्वाचा निर्णय घेतलाय purparisthitimule ज्यांना परीक्षा केंद्रावर पोचता आले नाही अशांना पुन्हा सी ई टी ची परिक्षदेता येणार आहे यासंबंधी पुढील परीक्षांच्या तरखंबाबत विद्यार्थ्यांना अचूक माहिती द्या असे आदेश सुधा मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत दरम्यान मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत झालेल्या नुकसानीची माहिती देताना मराठवाड्यासह दहा पैकी सात जिल्ह्यांमध्ये १८० टक्के पाऊस पाडल्याचे सांगितले तर आतापर्यंतच्या अतिवृष्टी ४३६जनचा मृत्यू झाला असून यापैकी ६जणांचे मृतदेह अजूनही सापडलेले नाहीत तर १३६ जन जखमी झाले आहेत अशी माहिती दिली दरम्यान नाशिक जिल्ह्यातील सर्व धरणे ओव्हर फ्लो झाली असून त्यांचे पणी गोदावरीत सोडावे लागेल त्यामुळे नाशिकला पुराच्या पाण्याचा धोका आहे जायकवाडी सारखे सर्वात मोठे धरण १०० टक्के भरल्याने धरणाचे ८ दरवाजे उघडण्यात आले पाऊस अजूनही थकलेला नसल्याने परिस्थिती चिंताजनक आहे
बॉक्स/मुसळधार पावसात ही ८१टक्के पंचनामे पूर्ण
सध्या सुरू असलेला पाऊस काही थांबायचे नाव घेत नाही मात्र प्रशासन पावसातही कामाला. लागले असून अतिवृष्टी झालेल्या काही भागातील ८१टक्के पंचनामे पूर्ण झाले असल्याची माहिती मिळतेय त्यामुळे दोन दिवसात पाऊस थांबला तर उर्वरित पंचनामे पूर्ण करून नुकसानभरपाई बाबत निर्णय घेतला जाईल