शाळा चालू होण्याची चाहूल लागताच स्कूल बसच्या भाड्यात ४० टक्के वाढ
मुंबई/ आजकाल कुठेच माणुसकी शिल्लक राहिलेली नाही त्यामुळे संकटात संधीचा फायदा घेण्यासाठी सगळेच स्वार्थी लोक तयार असतात म्हणून तर शाळा सुरू होण्याची चाहूल लागताच स्कूल बस मालकांनी ३० ते ४० टक्के भाडे वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे . करीनामुळे गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद आहेत त्यातच लॉक डाऊन मध्ये बऱ्याच लोकांचं रोजगार गेलाय त्यामुळे लोक मानसिक आणि आर्थिक तनावा खाली असताना पेट्रोल डिझेल दर वाढीचे कारण पुढे करून स्कूल बसचे भाडे वाढवण्यात आल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे .