ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

शालिनी सहकारी बँक लिमिटेड 43 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

शालिनी सहकारी बँक लिमिटेड 43 वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेचे अध्यक्ष आप्पासाहेब सदाशिव देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच वसंतदादा इंजीनियरिंग कॉलेज येथे संपन्न झाली.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना अध्यक्ष आप्पासाहेब देसाई यांनी बँकेची गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या मोबाईल नेट बँकिंग सेवेच्या मागणीची पूर्तता करून त्याद्वारे व्यवहार करण्याचे आव्हान केले. तसेच बँकेचे क्षेत्र पश्चिम महाराष्ट्र सोबत कोकणात करण्याचे प्रयोजन भाषणात व्यक्त केले. बँकेला सातत्याने ‘अ’ ऑडिट वर्ग मिळाला असल्याचे नमूद केले.
याप्रसंगी बँकेचे संचालक रमेश भुतेकर, वरून देसाई, आनंदराव शिंदे, निवृत्त देसाई, भानुदास देसाई, पत्रकार किसनराव जाधव, आलम शेख ,रवींद्र घोरपडे इत्यादी संचालक उपस्थित होते. त्याचप्रमाणे बँकेचे कार्यकारी संचालक बँकेचे अधिकारी, कर्मचारीवर्ग तसेच सभासद सहकारी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृत्तांत आणि अहवाल वाचन विशेष कार्यकारी अधिकारी प्रवीण शितोळे यांनी केले तर किशोर पोटे यांनी उपस्थित मान्यवर संचालक मंडळ, सर्व सहकारी संस्थांचे पदाधिकारी, बँकेचे अधिकारी, कर्मचारीवर्ग यांचे आभार मानले.

 
error: Content is protected !!