ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महापालिकामुंबई

अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याबाबत विरोधी पक्ष नेतेही आग्रही

मुंबई/ मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत या आदेशाचे मुंबई महापालिका प्रशासनाने पालन करून करोना काळात मुंबईत झालेली ८४ हजाराहून अधिक बांधकामे तोडून टाकावीत आणि पालिका प्रशासनावर आपला वचक निर्माण करावा असे मुंबई महापालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी म्हटले आहे. करोना काळात पालिका प्रशासन कोरॉनाचा प्रादुर्भाव रोखण्याचा प्रयत्नात असतानाच काही भूमाफिया नी काही लाचखोर पालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे केली . मात्र नागरिकांच्या तक्रारी येताच थातुर मतुर कारवाई करण्यात आली मात्र अजूनही मोठ्या प्रमाणावर करोना काळात झालेली बांधकामे तशीच आहेत आणि हीच अनधिकृत बांधकामे तोडण्याचा विरोधीपक्ष नेत्यांनी आग्रह धरला आहे .पण ही अनधिकृत बांधकामे स्थानिक नगरसेवकांना हाताशी धरून करण्यात आलेली असल्याने आणि यात काही पालिका अधिकाऱ्यांचेही खिसे गरम झालेले असल्याने मुख्यमंत्री संगीत की विरोधी पक्ष नेते संगीत कारवाई होणे कठीण आहे .

error: Content is protected !!