ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

मनसे कडून शिंदे गटाला दहा जागांचा प्रस्ताव


मुंबई/राज ठाकरेंची मनसे भलेही महायुतीत नसली तरी पडद्यामागून मनसे महायुती सोबतच आहे. मनसेने या निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला होता. त्यानुसार आत्तापर्यंत एकशे दहा उमेदवार जाहीर केले आहेत. परंतु मनसेची महाराष्ट्रातील संघटनात्मक ताकद पाहता मनसेचे खूप कमी लोक निवडून येतील. पण तेही महायुतीने त्या त्या मतदारसंघात त्यांना पाठिंबा दिला तर. अशी आज परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती ओळखून राज ठाकरेंनी महायुतीकडे दहा जागा सोडाव्यात अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता महायुती त्यांना दहा जागांवर पाठिंबा देणार का हाच खरा प्रश्न आहे
मुंबईच्या माहीम मतदारसंघात मनसेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे कारण या ठिकाणी राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे निवडणूक लढवीत आहेत. तर महाविकास आघाडीने या ठिकाणी महेश सावंत या शिवसेना उमेदवाराला उभे केले आहे .वास्तविक मनसे आणि शिवसेना यांच्यातच टक्कर होणार होती परंतु या विभागाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांनी माघार घेण्यास नकार दिला सदा उद्या उमेदवारी अर्ज भरणार आहे सदा जर उभे राहिले तर अमित ठाकरे यांचा पराभव निश्चित आहे. त्यामुळेच राज ठाकरे यांनी अत्यंत सेफ गेम खेळताना महायुतीकडे दहा जागांसाठी पाठिंबा बघितले आहे यामध्ये वरळी, शिवडी, माहीम ,अंधेरी, जोगेश्वरी, दिंडोशी, भांडुप, विक्रोळी, आणि कल्याण या दहा जागांचा समावेश आहे

error: Content is protected !!