ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

शिराळा मतदार संघाची निवडणूक संघर्षमय

नवी मुंबई-  शिराळा विधान सभा मतदार संघाचे भाजप आमदार पदाचे उमेदवार सत्यजित देशमुख यांना भाजपा कडून तिकीट मिळालेली आहे. रविवार दि. 27/10/2024 रोजी नवी मुंबई येथे शिराळा विधान सभा मतदार संघातील रहिवाशी यांची बैठक विष्णुदास भावे नाट्य गृह नवी मुंबई येथे आयोजित केलेली होती. मुंबई, ठाणे कल्याण , डोंबिवली येथुन रहिवाशी उपस्थित होते. सभेला शिराळकर रहिवाशी यांनी चांगला प्रतिसाद दिला . यावेळी भाजपाचे  आमदार प्रवीण दरेकर यांनी सत्यजित यांचे शिराळा तालुक्याला पर्यटन स्थळे करण्याचा मनोदयाला पाठिंबा दिला . पुन्हा सत्तेत आल्यावर शिराळा तालुका हा पर्यटन स्थळ अशी ओळख निर्माण करू असे आश्वासन दिले. त्यासाठी लागणारा निधी आम्ही देऊ.

           महाविकास आघाडीचे शिराळा विधान सभेचे विद्यमान आमदार मानसिंगराव नाईक यांनीही गेल्या रविवारी शिराळा मतदार संघातील मुंबईकर रहिवाशी यांची नवी मुंबई येथील विष्णुदास भावे नाट्य गृहात सभा आयोजित केलेली होती. त्यालाही शिराळकर रहिवाशानी भरघोष प्रतिसाद दिला .

सत्यजित देशमुख हे  स्व.शिवाजीराव देशमुख यांचे चिरंजीव आहेत. त्या काळात देशमुख यांनी  शिराळा मतदार संघात विकासाची काम मोठ्या प्रमाणात केलेलां आहे.

        विद्यमान आमदार मानसिंगराव नाईक हे या मतदार संघाचे मागील दोन पंच वार्षिक टर्मचे आमदार असून साखर कारखान्या सारखी बलाढ्य संस्था त्यांच्या पाठीशी  आहे. त्यामुळे जन संपर्क दांडगा आहे.
       शिराळा मतदार संघात वाळवा मतदार संघातील अठ्ठावीस मोठी गावे आहेत. निकालाचा तराजू त्यांच्यावर आणि नेते महाडिक मंडळीवर बरंच अवलंबून असते .पण या वेळी शिराळा मतदार संघाची निवडणूक अटी – तटिची होणार अशी जनते मध्ये चर्चा आहे.

error: Content is protected !!