दोन वर्षातले तीन पैशाचे सरकार- आशीष शेलार
मुंबई/राज्यातील महा विकास आघाडी सरकारने काल दोन वर्षाचा कालावधी पूर्ण केला यावर भाजपनेते आशीष शेलार यांनी आघाडीच्या दोन वर्षातील कामाचा पंचनामा करताना हे सरकार पुत्र, पुत्री आणि पुतण्या अशा पद्धतीचे तीन पैशाचे सरकार असल्याने या सरकारकडून दोन वर्षात जनतेच्या कोणत्याही अपेक्षा पूर्ण करू शकले नाही असे सांगितले.
महाविकास आघाडीने गेल्या दोन वर्षातील ७५० पेक्षा अधिक दिवसात काय केले हे त्यांनी सांगावे सरकार फक्त पुत्र,पुत्री आणि पुतण्या भोवतीच फिरत आहे.एक नाटक होत तीन पैशांचा तमाशा तसाच गेल्या दोन वर्षात या सरकारचा तीन पैशाचा तमाशा सुरू आहे असे शेलार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.या नाटकात सत्ता आणि संपतीसाठी अमर्याद आणि अमानुष पद्धतीचा वापर आणि दुखाभोवतीची सहानुभूती असे या नाटकाचे कथानक असल्याचे त्यांनी सांगितले.आज महाराष्ट्राची स्थिती सुधा तशीच aahetin नाती आणि तीन पक्ष यांचा सते भोवतीचा लोभ आनिवत्यातून संपत्तीची निर्मिती तर सामान्य नागरिक आणि महाराष्ट्राला दुःख असे चित्र आहे.वास्तविक या सरकारचे काम जनतेच्या भोवती केंद्रित असायला हवे होते पण ते पुत्र पुत्री आणि पुतण्या भोवती केंद्रित झालंय असेही ते म्हणाले