पालिकेसाठी डास बनले खास -त्यांना मारण्यासाठी पालिकेच्या गळ्याला १० कोटींचा फास
मुंबई/ साथीचे रोग पसरविणारे डास सध्या मुंबई महापालिकेच्या गळ्याचा फास बनले आहेत कारण त्यांना मारण्यासाठी मुंबई महापालिकेला दर वर्षी १० कोटी १२लाख रुपये खर्च करावा लागतोय.
नाना पाटेकर यांचा एका सिनेमात डायलॉग आहे एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है मगर याहा तो कयी माच्छारोने पालिका की कंगाल बना दिया है! त्यामुळे या डासांचा बंदोबस्त केला नाही तर डेंग्यू, मलेरिया टायफाईड यासारखे साथीचे रोग पसरतात त्यामुळे या डासाची उत्पती रोखण्यासाठी कीटकनाशक विभागाकडून अळी नाशक तेलाची फवारणी करण्यात येते यासाठी दरवर्षी तब्बल ११लाख लिटर तेलाची खरेदी करावी लागते.हे तेल ९२ रुपये प्रति लिटर असल्याने त्यासाठी १० कोटी १२लाख ४४हजार रुपये लागतात आणि पुढील वर्षी पालिका त्यासाठी३० कोटी ३७ लाख खर्च करणार आहे त्यात कुणाची किती हिस्सेदारी म्हणजेच टक्केवारी किती आहे ते लवकरच मुंबई जनसत्ता उघडकीस आणणार आहे त्यामुळे पालिकेतील मच्छराणी सावध राहावे असा इशाराच मुंबई जनसत्ताणे दिलाय.