ओमायक्रॉन’ हा खूप धोकादायक नाही -राजेश टोपे
“आपल्या देशामध्येच आज ‘ओमायक्रॉन’ नावाचा कुठलाही व्हेरिएंट नाही. त्यामुळे तशी घाबरण्याचीही गरज नाही आणि ‘ओमायक्रॉन’ हा खूप धोकादायक आहे, असंही कुणी डोक्यात आणण्याची गरज नाही. कारण, तसं काही सिद्धही झालेलं नाही.” असं राजेश टोपे यांनी सांगितलं नअही.
करोना महामारीचं संकट ओसरत नाही तोच आता ‘ओमायक्रॉन’ या नावाच्या नव्या व्हेरिएंटच्या संकट ओढावू पाहत आहे. सध्या संपूर्ण जगावर करोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनने दहशतीचं वातावरण निर्माण केलंल आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्य शासनाकडून अधिकच खबरदारी घेण्यास सुरूवात झालेली आहे. मात्र असे जरी असले तरी देखील नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.