अजमेर दर्ग्यावर दावा करण्याच्या याचिकेमुळे पुन्हा एकदा वातावरण तापले
जयपूर/राजस्थानच्या अजमेर मधील जगप्रसिद्ध असलेल्या ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती दर्गा हा हिंदूंचा आहे कारण या दर्ग्याखाली मंदिर होते असा दावा करणारी विष्णू गुप्ता या हिंदुत्ववादी कार्यकर्त्याची याचिका न्यायालयाने दाखल करून घेतल्यामुळे केवळ राजस्थानातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील वातावरण तापलेले आहे
अजमेर मधील ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती दर्गा हजारो वर्षापासून चा आहे आणि या दर्ग्यात सगळ्या जाती धर्माच्या लोकांना प्रवेश आहे परंतु गेल्या काही वर्षांपासून देशातील अनेक मज्जिद खाली हिंदूंची मंदिरे असल्याचा दावा केला जात आहे मग तो ज्ञानव्यापी मशीद असो की अन्य कुठली मशीद असो. संबलमध्ये अशाच प्रकारच्या दाव्यामुळे दंगल उसळली होती आणि पाच लोकांना आपल्या जीव गमावा लागला होता .आता जगभरातील मुस्लिम म्हणजे श्रद्धास्थान असलेल्या दर्ग्यावरही अशाच प्रकारचा दावा करण्यात आलेला आहे .या प्रकरणाची लढाई आता न्यायालयात लढली जाणार आहे .. सर्वोच्च न्यायालय याबाबत काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
