ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्र

गांधी आणि मनुवादी!

भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे.इथे भलेही लोकांना धार्मिक स्वातंत्र्य असले तरीसुद्धा धर्मसंसद हा प्रकारच लोकशाही विरुद्ध आहे.बरे धर्म संसदेच्या माध्यमातून जर समाजासाठी,देशासाठी काही चांगले काम होणार असेल .आणि धर्मसंसदेतून समाजासाठी बंधुत्वाची भूमिका मांडली जाणार असेल तर ठीक होते.पण धर्मसंसदेचा वापर करून आपलाच हिंदू धर्म किती श्रेष्ठ आहे हे पटवून देण्यासाठी दुसऱ्याच्या धर्मावर टीका करणे त्यातून धार्मिक द्वेषभावना निर्माण करणे आणि देशासाठी रक्त संडणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांची बदनामी करणे हे संतापजनक आहे .छतीस गड मधील रायपूर मध्ये भरलेल्या धर्म संसदेत कोण कुठला कलीचरण बाबा महात्मा गांधींवर टीका करतो काय तर म्हणे त्यांनी सरदार वल्लभ पटेल यांना पंतप्रधान व्हायला दिले नाही .पण हा कलीचरण बाबा जर संत असेल तर राजकारणाशी त्याचा काय संबंध आणि गांधीजी बद्दल बोलायची त्याची लायकी आहे का ? पण आजकाल काही प्रतिगामी लोकांनी गांधीजींना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे . गांधीजींची हत्या करणारा नथुराम गोडसे याचे उदातिकरण केले जात आहे वास्तविक केंद्राने हे सर्व थांबवायला हवे पण या देशाच्या दुर्दैवाने केंद्रात प्रतिगामी लोकांचे सरकार आहे त्यामुळे अशा बिनडोक बाबांचे प्रस्थ माजली त्यांना महत्व प्राप्त झालाय.

error: Content is protected !!