पेट्रोल – डिझेल ७ ते ८ रुपयांनी स्वस्त होणार ?
मुंबई: समस्त जनसामान्यांसाठी मोठी बातमी आहे. येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर ७ ते ८ रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोल १०६ रुपयांवरून ९ ते ९९ रुपये प्रति लिटरवर येण्याची चिन्हं आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाल्यामुळे तसेच आगामी लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केंद्र सरकार हा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
यंदाच्या तिमाहीत तिन्ही सरकारी कंपन्यांना मिळून २८ हजार कोटींचा नफा झाला आहे. गेल्या तीन तिमाहींचा विचार केला तर हा नफा एक लाख कोटींच्या घरात आहे. आणखी एक मोठं कारण म्हणजे गेल्या वर्षभरात आंतरराष्ट्रीय बाजारांत तेलाचे दर ७५ डॉलर प्रति बॅरेलपेक्षाही कमी झालेत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे येत्या एप्रिल आणि मेमध्ये लोकसभा निवडणुका आहे. त्या अनुषंगानं देखील केंद्र सरकारनं हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय.
देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गेल्या ५८९ दिवसांपासून स्थिर आहेत. त्यांच्या किमतीतील शेवटचा बदल मे २०२२ मध्ये दिसून आला. आता कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाल्यामुळे देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकार घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ही किंमत ७ ते रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे.