बीड मधील आक्रोश मोर्चाला प्रचंड प्रतिसाद वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडेंवर ही कारवाई करण्याची मागणी
बीड- सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला या मोर्चाला बीड जिल्हा आणि आसपासच्या परिसरातील तसेच मुंबई ठाणे पुणे आधी शहरांमधूनही मोठ्या संख्येने लोक हजर होते उपस्तुतांमध्ये भाजप आमदार सुरेश धस स्वराज्य संघटनेचे नेते छत्रपती संभाजी राजे शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे ,आमदार जितेंद्र आव्हाड आदी अनेक मान्यवर उपस्थित होते या सर्वांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सरकारवर आणि खास करून सरकारमधील मंत्री असलेल्या धनंजय मुंडे वर टीकेची झोड उठवली संतोष देशमुख यांच्या हत्येला 19 दिवस झाले तरीसुद्धा या हत्येचा मास्टर माइंड असलेला वाल्मिकी कराड पोलिसांना कसा सापडला नाही असा सवाल करीत मोर्चातील उपस्थित नेत्यांनी सरकारवर आणि खास करून गृह खात्यावर टीकेची झोड उठवली तसेच धनंजय मुंडे मंत्रिमंडळात असेपर्यंत वाल्मिकी करायला संरक्षण मिळणार आहे त्यामुळे त्यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी आणि या प्रकरणातील वाल्मिकी कराड आणि त्याच्या साथीदारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली वाल्मिकी कराड वर फक्त खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे परंतु देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिकी कराड आज मास्टर माईंड असल्याने त्याच्यावर हे गुन्हा दाखल व्हायला हवा जर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला नाही आणि त्याला अटक झाली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात एक मोठे आंदोलन उभे केले जाईल असा इशारा मोर्चातील नेत्यांनी दिला त्याचबरोबर वाल्मिकी कराडने आतापर्यंत बीडमध्ये कशा प्रकारचे दहशतवाद माजवली आणि लोकांचे मुडदे पाडले याबाबतची माहिती आमदार सुरेश धस यांनी दिली तर मोर्चातील इतर नेत्यांनीही कराडला सरकार पाठीशी घालत आहे का असा सवाल केला आणि याप्रकरणी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली विशेष म्हणजे या मोर्चाच्या दिवशी बीड जिल्ह्यातील काही शहरांमध्ये बंद पाळण्यात आला होता त्या मोर्चाला संतोष देशमुख यांचे कुटुंबीय हजर होते या मोर्चात संतोष देशमुख यांच्या कल्याणी भाषण केले आणि आपले वडील समाजसेवक होते असे असताना त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली त्यामुळे आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्व पक्षी आणि आमच्या पाठीशी राहावे असे आवाहन तिने केले