ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्र

भय्यू महाराजांच्या तीन सेवेकरणा प्रत्येकी ६ वर्षांची शिक्षा


इंदूर/ आध्यात्मिक स्वामी भय्यु महाराज यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी त्यांचे तीन सेवेकरी पलक ,शरद आणि विनायक याना न्यायालयाने प्रत्येकी ६ वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
१२ जून २०१८ रोजी भय्यू महाराज यांनी आपल्या परवानाधारक पिस्तुलातून डोक्यावर गोळी झाडून आत्महत्या केली होती. या प्रकरणामुळे संपूर्ण देशात खळबळ माजली होती. सदर प्रकरणात पोलिसांनी तपास करून आत्महत्येला कारणीभूत असलेल्या भय्यू महाराजांच्या ३ सेवेकऱ्यांना अटक केली होती. या तिघांनी ब्लॅकमेल करून त्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा आरोप भय्यू महाराजांच्या दुसऱ्या पत्नीने केला होता. त्यानुसार पोलिसांनी सेवेकरी विनायक, केअरटेकर पलक आणि वाहन चालक शरद यांना अटक केली होती. या तिघांविरुद्ध सत्र न्यायालयात खटला सुरू होता. या प्रकरणात आरोपींच्या बाजूने एडवोकेट धर्मेंद्र गुर्जर यांनी युक्तीवाद केला. त्यानंतर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या सुनावणी कोर्ट-४८ जिल्हा अप्पर न्यायाधीश धर्मेंद्र सोनी यांनी तिघांना दोषी ठरवून प्रत्येकी ६ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. या तिघांनी भय्यू महाराज यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप सिद्ध झाल्यामुळे न्यायालयाने त्यांना ही शिक्षा ठोठावली.

error: Content is protected !!