ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेताज्या बातम्यामुंबई

पोलीस असल्याची बतवाणी करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या दोघांना अटक

मुंबई पोलीस असल्याची बतवाणी करून एका अल्पवयीन मुलीवर भरदिवसा बलात्कार करणाऱ्या दोघांना डोंबिवली पोलिसांनी अवघ्या २४ तासात अटक केली आहे.
विष्णु सुभाष भांडेकर (वय २५) व आशिष प्रकाशचंद गुप्ता (वय ३२)अशी अटक करण्यात आलेल्या या आरोपींची नावे आहेत.
शुक्रवारी दुपारी ३.३०च्या सुमारास ठाकुर्ली रेल्वे स्टेशन जवळ पश्चिम येथे दोन अनोळखी आरोपीनी फिर्यादीला पोलीस असल्याची धमकी दिली आणि तिचा मित्राची चौकशी करण्याच्या बहाण्याने ठाकुर्ली येथील खाडी किना-या जवळ जंगलात, निर्जनस्थळी नेऊन फिर्यादीची कोणतीही संमती नसताना, जबरदस्तीने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला.
तसेच मुलीचे व्हिडीओ फोनमध्ये रेकॉर्ड करत, जर कोणाला सांगितलेस तर मी तुझी सर्वत्र बदनामी करेन अशी धमकी मुलीला दिली. दरम्यान यातील दुसऱ्या आरोपीने चल मी तुला सोडवतो, असे सांगत त्या मुलीवर बलात्कार केला आणि सदर ठिकाणाहून दोघेही पळून गेले.
हा सर्व प्रकार घडल्यानंतर त्या घाबरलेल्या मुलीने विष्णुनगर पोलीस स्टेशन गाठून
घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.
कलम ३७६ (ड), ५०६ सह पोक्सो कायदा कलम ४,८,१२ व आय टि अॅक्ट ६६ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला.
दरम्यान भरदिवसा अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना डोंबिवलीत घडल्याने एकच खळबळ उडाली होती.
या घटनेची गंभीर दखल घेत अतिरिक्त
पोलिस आयुक्त दत्तात्रय शिंदे , कल्याण परीमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ,परीमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे , डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल कु-हाडे आणि विष्णुनगर पो.स्टे. चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली विष्णुनगर व मानपाडा पोलिस ठाण्याचे पाच पथके तयार करण्यात आली होते.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मोहन खंदारे, राहुल खिल्लारे, पोउप.आंधळे, दिपविजय भवर, मपोउनिरी मोहीनी कपिले व मानपाडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदशनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील तारमळे ,वनवे, स.पो.उप.निरी. काटकर, पो. हवा. खिलारे,टिकेकर, मासाळ, पवार. पो. ना .भोईर, शिरीश पाटिल, घाडगे, कसबे, पवार, पाटिल, आहेर, आव्हाड यांचे मार्फतीने समांतर तपास सुरु केला.
अनोळखी आरोपीबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नसतांना या पथकाने तांत्रिक विश्लेषनाच्या व गुप्त बातमीदाराच्या मदतीने यातील आरोपी विष्णु भांडेकर , रा. गावदेवी चाळ २ साईनाथ नगर नेवाळी नाका, कल्याण आणि आशिष गुप्ता, रा. रुपाबाई निवास रुम नं ३ दत्त चौक नांदिवली रोड डोंबिवली या दोघांना २४ तासात अटक केली.
यातील विष्णु भांडेकर हा बिगारी कामगार आहे तर आशिष गुप्ता हा चहाची टपरी चालवतो. विष्णु भांडेकर हा अभिलेखा वरील आरोपी असून त्याच्यावर विष्णु नगर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहे .
अशी माहिती पोलिसांनी दिली.

(शिरीष वानखेडे):

error: Content is protected !!